Ganesh Dhatrak Politics: गणेश धात्रक यांचा भाजप प्रवेश, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना धक्का अन् एकनाथ शिंदेंना डोकेदुखी?

Ganesh Dhatrak; Shock to Shivsena Uddhav Thackeray, Assembly candidate Ganesh Dhatrak joins BJP-महायुतीमध्ये राजकीय उलथापालथ, गणेश धात्रक यांच्या भाजप प्रवेशाने महायुतीच्या घटक पक्षांतच रस्सीखेच.
Ganesh Dhatrak joins BJP
Ganesh Dhatrak joins BJPSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Dhatrak News: नांदगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार गणेश धात्र यांनीच पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षांतच वर्चस्वासाठी चुरस निर्माण होण्याची भिती आहे.

विधानसभा निवडणुकीत गणेश धात्रक यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी केली होती. त्यात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. निवडणुकीतील पराभवानंतर श्री. धात्रक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा होरा होता.

Ganesh Dhatrak joins BJP
Pahalgam Terror Attack: अद्यापही दीड हजार मराठी पर्यटक श्रीनगरमध्ये, आज विशेष विमान सोडणार!

नांदगावचे अंतर्गत राजकारण पाहता महायुतीतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यात आता गणेश धात्रक हा नवा सहकारी सहभागी झाला आहे.

Ganesh Dhatrak joins BJP
Pahalgam Terror Attack : छगन भुजबळ संतप्त; सांगितली पहलगाम हल्ल्यामागची `ती` कारणे!

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात बंडखोरी झाल्यानंतर आमदार सुहास कांदे हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सर्व दारोमदार गणेश धात्रक यांच्यावर होती. आता धात्रक यांच्या भाजप प्रवेशाने उद्धव ठाकरे यांना नांदगाव मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.

नांदगाव मतदार संघात सध्याची राजकीय स्थिती पाहता भारतीय जनता पक्ष चाचपडताना दिसत होता. विशेषत: मनमाड शहरात भाजपला लोकांमध्ये प्रभाव असलेल्या नेत्याची आवश्यकता होती. माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या प्रवेशाने ती पूर्ण झाली आहे.

सध्या महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसचे बहुतेक नेते आमदार कांदे यांच्यासोबत गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे येथे फारसे नेटवर्क राहिलेले नाही. आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाही मोठा राजकीय धक्का बसला आहे.

नांदगाव आणि मनमाड शहराचे सर्व राजकारण आता महायुती केंद्रित झाले आहे. श्री धात्रक यांच्यासोबतच बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड, माजी नगरसेवक ॲड सुधाकर मोरे, प्रमोद पाचोरकर, संजय मिश्रा, लियाकत शेख, अकबर सोनावाला, संतोष जगताप, चंद्रकांत परब, आनंद बोथरा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक जाधव या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात भाजप अधिक प्रबळ होणार आहे.

महायुतीत राजकीय चढाओढ

गणेश धात्रक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजपची सूत्रे धात्रक यांच्याकडे आली आहे. माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव मतदार संघात विशेष लक्ष घालून आहेत. विधानसभा निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. समीर भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आहेत. ही प्रमुख नेते आणि मतदारसंघात वर्चस्व असलेले पक्ष आता महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे आगामी कळत राजकारण कोणती दिशा घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com