नाशिक : येवला विंचूर रस्त्यावर आज दुपारी धुळगाव फाटा येथे एका कारचा अपघात झालेला (Car accident at Vinchur-yeola road) पाहून पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तेथे थांबून अपघाताची माहिती घेत तातडीने मदतीच्या सूचना केल्या. भुजबळ यांच्या सूचनेमुळे यंत्रणेनेही तत्काळ हालचाली करत अपघातग्रस्तांची मदत केली.
श्री. भुजबळ आज येवला दौरा आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निफाडकडे जात होते. यावेळी धुळगाव फाटा येथे झालेला अपघात पाहून ते तत्काळ येथे थांबले. सोबत असलेल्या पदाधिकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याठिकाणी थांबत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर त्यांनी येवला येथील डॉक्टरांना फोनवरून संपर्क करत अपघातग्रस्तांवर उपचाराच्या सूचनाही दिल्या. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबवून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या.
ठळक सूचनाफलक लावावेत
येवला- नाशिक मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. ही कामे सुरू असलेल्या ठिकाणी ठळक अक्षरात वाहनांना योग्य दिशा दर्शविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले. गरज असल्यास वाहतूक विभागाची मदत घेऊन वाहतूक वळविण्यात यावी असे आदेश देखील त्यांनी दिले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.