Girish Mahajan; कविता राऊत हिच्यासह खेळाडू होणार ‘क्लास वन’

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन : माजी मंत्री छगन भुजबळ यांचा तारांकित प्रश्न
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवून देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना (Sportsmens) शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नसल्याचा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देत क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकचे खेळाडू कविता राऊत, (Kavita Raut) दत्तू भोकनळ, (Dattu Bhoknal) अंजना ठमके (Anjana Thamke) यांना दोन महिन्यात ‘क्लास वन’ नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे. (National players will be get Government Job soon)

Girish Mahajan
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या विषयावर काल विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. राज्य शासनाकडून या खेळाडूंची उपेक्षा होते. त्यांना नोकरीचे आश्वासन दिले असल्याने शासनाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली होती.

Girish Mahajan
Gopichand Padalkar; आमदारांनो तुम्ही सांगलीला याच!

आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झाला.

३० एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी शासकीय सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत.

Girish Mahajan
Nandurbar News; आम्ही पण महाराष्ट्रातच राहतो ना?

या खेळाडूंनी हे निकष पूर्ण केलेले असताना त्यांना अद्याप शासकीय नोकरी का मिळाली नाही, असा मुद्दा माजी मंत्री भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना क्रीडामंत्री महाजन म्हणाले, नवीन क्रीडा धोरणानुसार या खेळाडूंना ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com