Nashik BJP Politics: भाजपच्या ‘100 प्लस’ घोषणेने एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या इच्छुकांची झोप उडाली!

Maharashtra Election BJP 100 Plus Shinde Pawar Seat Sharing: विद्यमान नगरसेवकांच्या जागा सहकारी पक्षांना सोडण्याचा दानशूरपणा भाजपला परवडेल काय?
Eknath-Shinde-Girish-Mahajan-Ajit-Pawar
Eknath-Shinde-Girish-Mahajan-Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

NMC Election News: भाजपसह महायुतीच्या तिन्ही पक्षांनी नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात सुरुवातीला वेग घेतलेला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आता बचावात्मक स्थितीत आला आहे. भाजपचे हंड्रेड प्लस धोरण त्याला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जो जो इच्छुक असेल त्या सगळ्यांना कोणतीही तपासणी न करता प्रवेश देण्याचे पक्षाचे धोरण आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अतिशय आक्रमक धोरण राबवत आहेत.

भारतीय जनता पक्षात मावळत्या महापालिका सभागृहात ६५ नगरसेवक होते. १२२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत `हंड्रेड प्लस` हे भाजपचे धोरण आहे. या स्थितीत भाजप किमान १०० जागांवर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यामध्ये निम्म्याहून अधिक अर्थात जागांवर भाजपकडे माजी नगरसेवकच इच्छुक आहेत.

Eknath-Shinde-Girish-Mahajan-Ajit-Pawar
Anil Kadam Politics: माजी आमदार अनिल कदम यांचा दावा; अजित पवार यांच्या 'त्या' ऑफरने बदलले असते निफाडचे राजकारण?

भाजपच्या या आक्रमक धोरणामुळे महायुतीतील सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील इच्छुकांची झोप उडाली आहे. भाजपसोबत या दोन्ही पक्षांना युती हवी आहे. मात्र युती केल्यास अनेकांचा पत्ता कट होण्याची धास्ती देखील आहे.

गेल्या महिन्यात भाजप पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील विविध माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. अद्यापही अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. या संदर्भात सातत्याने वावड्या उठत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अधिक प्रभावी होत असल्याने महायुतीच्या सहकारी पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भाजपने आपल्या विद्यमान नगरसेवकांसह अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. अशा स्थितीत आपल्या हक्काच्या जागा भाजप सहकारी पक्षांसाठी सोडणार का? हा गंभीर प्रश्न आहे. तसे झाल्यास पक्षात बंडखोरीचे ग्रहण लागण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपच्या वाढत्या प्रभावाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची झोप सध्या उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com