Shalarth ID fraud latest news : शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी म्हणतोय, "यापेक्षा मरण बरे!" महाजनांच्या निकटवर्तीयाचा पोलिसांसमोरच आक्रोश

Sanjay Garud police questioning : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान गिरीश महाजनांचे निकटवर्तीय संजय गरुड पोलिसांसमोर भावूक झाले. या प्रकरणातील ताजे अपडेट, चौकशीची माहिती आणि राजकीय घडामोडी जाणून घ्या.
Shalarth ID fraud latest news : शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी म्हणतोय, "यापेक्षा मरण बरे!" महाजनांच्या निकटवर्तीयाचा पोलिसांसमोरच आक्रोश
Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Garud News: जळगाव जिल्ह्यातील राजकीय प्रस्थ आणि भाजप नेता संजय गरुड याला अटक झाली. शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील 15 शाळांमध्ये 177 बनावट नियुक्त्या झाल्या. शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आणि भाजप नेता संजय गरुड याचा त्यात मुख्य सहभाग होता. नाशिक पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चक्र फिरले.

संजय गरुड यांचा चुलत भाऊ दीपक गरुड याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. दीपक गरुड याला मदत करणाऱ्या अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दीपक गरुड यांनीही प्रकृती बरी नसल्याचे सांगत दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला.

Shalarth ID fraud latest news : शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी म्हणतोय, "यापेक्षा मरण बरे!" महाजनांच्या निकटवर्तीयाचा पोलिसांसमोरच आक्रोश
NCP Merger: NCP विलीनीकरणाची पुन्हा चर्चा! शरद पवार यांच्या आमदाराच्या लेकीच्या पोस्टनं वाढवली उत्सुकता

संजय गरुड हे भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाजन यांच्यासाठी प्रचार यंत्रणा उभी केली होती. आधीच्या दोन निवडणुका ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर महाजन यांच्या विरोधात उमेदवार होते. त्यामुळे गरुड यांची आधीची राजकीय भूमिका देखील चर्चेत आहे.

सत्ताधारी भाजपचे नेते आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून संजय गरुड यांचा चांगलाच दबदबा होता. कालपर्यंत जळगावच्या राजकीय नेत्यांत ते उजळ माथ्याने वावरत होते. आता तेच संजय गरुड शालार्थ आयडी घोटाळ्यात अडकले. पोलीस उपायुक्त संजय मिटके यांच्या पथकाने संजय गरुड आणि त्याच्या कुटुंबीयांवर कारवाईचा पास आवळला.

Shalarth ID fraud latest news : शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी म्हणतोय, "यापेक्षा मरण बरे!" महाजनांच्या निकटवर्तीयाचा पोलिसांसमोरच आक्रोश
Nashik Municipal Corporation : नगरसेवक मुलगा महिनाभरापासून जायबंदी; आता भाजप नेते दिनकर पाटील महापालिका प्रशासनाला कोर्टात खेचणार

त्यामुळे राजकीय पाठबळाची अपेक्षा असलेला गरुड खचला. पोलीस कोठडीत पोहोचताच चौकशी दरम्यान त्याने 'अशी अटक होण्यापेक्षा मरण आले असते तर बरे झाले असते' असे वक्तव्य केल्याचे कळते.

अटकेनंतर पोलीस चौकशी दरम्यान गरुड याची मानसिक अवस्था ढासळली आहे. सध्या तो रुग्णालयात आरामात आहे. मात्र पोलिसांच्या प्रश्नांनी तो उद्विग्न झाल्याचे कळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com