संजय राऊतांमुळेचं भाजपला यश ; गिरीश महाजनांनी सांगितलं विजयाचं गमक

संजय राऊत हे दररोज सकाळी उठून टीव्हीवर बडबड करीत असतात. त्यांच्या या वायफळ बडबडीचाही पक्षाला या निवडणुकीत फायदा झाला.
Girish Mahajan, Sanjay Raut
Girish Mahajan, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : "भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन, टीमवर्क आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वायफळ बडबड करून अपक्षांचा केलेला अपमान यामुळे भारतीय जनता पक्षाला राज्यसभेत यश मिळाले," असा टोला भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला आहे. (Girish Mahajan latest news)

राज्यसभा निवडणुकीत (rajya sabha election result) भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार विजयी करण्याची जबाबदार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही होती. विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू व भाजपचे ते ‘संकटमोचक’समजले जातात. राज्यसभेत भाजपचे उमेदवार धनजंय महाडिक विजयी होणारच, असा दावाही त्यांनी छातीठोकपणे ‘सरकारनामा’शी बोलतांना केला होता. तो विश्‍वास त्यांचा सार्थ ठरला आहे.

Girish Mahajan, Sanjay Raut
rajya sabha result : दोन आमदारांच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

राज्यसभेतील विजयानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे टीम वर्क, नियोजन आणि जिंकण्यासाठी लढण्याची जिद्द यामुळे भाजपला यश मिळाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे दररोज सकाळी उठून टीव्हीवर बडबड करीत असतात. त्यांच्या या वायफळ बडबडीचाही पक्षाला या निवडणुकीत फायदा झाला. त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवारांचा ‘घोडेबाजार’म्हणून अपमान केला, त्यामुळे अपक्ष उमेदवार दुखावले गेले आणि त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपला मतदान केले.

एमआयएमकडे लाचारी

शिवसेनेवर टीका करतांना महाजन म्हणाले, "आपला उमेदवार विजयी होण्यासाठी शिवसेनेने अक्षरक्ष:लाचारी पत्करली दोन मतांसाठी एमआयएम समोर गुडघे टेकले तरीही त्यांना यश मिळाले नाही,"

Girish Mahajan, Sanjay Raut
आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोमणा

तुम्ही दाखविलेल्या अमिषाचे काय?

राज्यसभा निवडणूकीत भाजपने पैशाचा पाऊस पाडला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याचा समाचार घेताना महाजन म्हणाले, "अपक्षांनी आम्हाला मतदान केले तर पैशाचा पाऊस,ईडी,सीबीआयचा धाक दाखविला असा आरोप केला जातो. तुम्हाला मतदान केले तर ते पवित्र पध्दतीने झाले असे तुम्ही म्हणतात, परंतु निवडणुकीत तुम्ही अपक्ष तसेच इतर लहान पक्षाना मतदानासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. हे तुमचे अमिष नाही का? याचेही उत्तर त्यांनी द्यावे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com