Girish Mahajan Politics: मंगेश चव्हाण यांना पाठबळ देत गिरीश महाजन टिपणार एका गोळीत तीन सावज!

Girish Mahajan, Mahajan Pramote Mangesh Chavan & ignore gulabrao Patil- भाजपच्या शासकीय कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघातपालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपेक्षा?
Girish Mahajan & Gulabrao Patil
Girish Mahajan & Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News: ग्राम विकास मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे सर्वेसर्वा गिरीश महाजन सध्या वेगळेच राजकीय डाव टाकत आहेत. काल चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपने पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साईड ट्रॅक केले. आठवड्याभरात दुसऱ्यांदा असे झाले.

या राजकीय हालचालींची कुण कुण मंत्री पाटील यांनाही लागली आहे. त्यामुळे ते काहीसे आक्रमक झाले होते. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव येथील शासकीय योजनांच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्धार त्यांनी केला होता, असे कळते. मात्र शिंदे गटाच्या वरिष्ठांनी सूचना केल्याने केल्यामुळे त्यांना जावे लागले.

या सर्व घडामोडींत भाजप नेते गिरीश महाजन यांनी गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर स्तुती सुमने उधळली. त्यांच्या कामाचे कौतूक करीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही संदेश दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चर्चेचे कारणही तेच आहे.

भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे आगामी नेतृत्व म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडे पहावे, असे संकेत महाजन वारंवार देत आहेत. हे करताना अनपेक्षितपणे मंत्री महाजन एका गोळीत तीन शिकार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात महायुतीत आपले स्थान किती महत्वाचे आहे, हे बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Girish Mahajan & Gulabrao Patil
Ajit Pawar And Sangram Jagtap : 'लाडक्या बहीण'साठी उपमुख्यमंत्र्यांची घाई; आदेशापूर्वीच आमदार जगतापांची घोषणा

जळगाव जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांना आपले स्थान बळकट ठेवायचे आहे. यामध्ये आमदार चव्हाण हे मंत्री महाजन यांच्या शब्दाबाहेर जाणारे नाहीत. त्यामुळे मंत्री महाजन यांची पावले या दिशेने वळू लागली आहेत.

आमदार चव्हाण हे आक्रमक नेते म्हणून चर्चेत आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर थेट आरोप करत नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. दुसरीकडे आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील पालकमंत्री असूनही त्यांच्याकडे कानाडोळा करण्यात आला.

यामध्ये देखील हाच संकेत आहे. आमदार चव्हाण एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्याचवेळी भाजपला राम राम ठोकत गिरीश महाजन यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणारे माजी खासदार उन्मेश पाटील यांचाही आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून परस्पर राजकीय कार्यक्रम करण्याचे संकेत यात आहेत. यामध्ये मंत्री महाजन यांच्या विरोधकांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न आहेत हे लपून राहिलेले नाही.

Girish Mahajan & Gulabrao Patil
Milk Price Hike Movement : 'आताची अंघोळ दुधाची, पुढची...'; ठाकरे गटाचा मंत्री विखेंना इशारा

चाळीसगाव मतदारसंघात सध्या सामाजिक दृष्ट्या मराठा आणि देशमुख मतांचे प्राबल्य आहे. त्या दृष्टीने देखील भाजपला आमदार चव्हाण हे सोयीचे वाटतात. त्यामुळेच गिरीश महाजन यांनी आमदार चव्हाण यांच्या राजकीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे, असे बोलले जाते. मात्र त्याच वेळेस सातत्याने गुलाबराव पाटील पालकमंत्री असूनही त्यांची राजकीय अपेक्षा करण्याचा प्रयत्न दिसून येतो.

जळगावमध्ये महायुतीचे राजकारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोणत्या दिशेला जाणार यावर कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. यातून महायुतीच्या जागावाटप आणि विविध मतदारसंघांमधील दावा बळकट करण्याचा प्रयत्न देखील भाजप करणार आहे त्या दृष्टीने सध्याचे डावपेच भाजपच्या सोयीचे आहेत.

---------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com