Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी आहे. जेथे बंडखोरी नाही तिथे संघटनेतील पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांची धावपळ होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये संघटनेतील पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे ते विधानसभा उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालेले नाही.
पक्षाचे आमदार आणि संघटनेतील पदाधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुरावा आहे. त्याचा निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम होत असल्याचा अहवाल पक्षाला प्राप्त झाला होता. त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी देखील श्री तावडे यांच्या उपस्थितीत बंडखोर आणि नाराज पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यातूनही अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही.
आता थेट मंत्री महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत. यामध्ये नाशिकमध्ये मतदारसंघातील आमदारांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचे कळते.
अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळालेले पदाधिकारी नाराज आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाचे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी केली आहे.
या मतदारसंघात १६ इच्छुक उमेदवार होते. यातील बहुतांशी अद्यापही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे मंत्री महाजन यांनी विधानसभा निहाय या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. नाशिक पश्चिम मतदारसंघात एका नगरसेविकेच्या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यावेळी नाराज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. नाशिक रोड आणि अन्नभागातील नाराज पदाधिकाऱ्यांशी देखील महाजन यांनी मध्यरात्रीपर्यंत रॅडिसन या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यक्तिशः चर्चा केली.
या चर्चेनंतर आज आमदारांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल. त्यातून नाराजी दूर करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला आहे. मंत्री महाजन यांनी दौरा केला असला तरी, चांदवड- देवळा यासह अन्य काही ठिकाणी झालेली बंडखोरी समविण्यात त्यांना यश आलेले नाही.
एकंदरच भारतीय जनता पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री महाजन यांनी चांगलीच धावपळ केली आहे. त्याला किती यश येते हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.