Girish Mahajan On Rohit Pawar : 'रडून निवडणुका जिंकता येणार नाहीत' ; गिरीश महाजनांनी रोहित पवारांना डिवचले!

Girish Mahajan News : बारामतीमधी सभेत बोलताना रोहित पवार भावूक झाले होते, ज्यावरून अजित पवारांनीही त्यांची मिमीक्री केली होती.
Girish Mahajan On Rohit Pawar
Girish Mahajan On Rohit PawarSarkarnama

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आणि आमदार रोहित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) जळगाव मतदार संघातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या राजकारणावरही त्यांनी टिप्पणी केली. विशेषत: आमदार रोहित पवार यांना त्यांनी चांगलाच चिमटा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गिरीश महाजन शरद पवार(Sharad Pawar) यांचा थेट उल्लेख टाळत म्हणाले, 'कधी पावसात ओलं व्हायचं. कधी रडायचं. कधी आजारी पडायचं. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची तब्येत कमी जास्त असते. त्यांना त्याचा त्रास होत असतो. त्यांच्या प्रकृतीवर बोलणं उचित होणार नाही.'

महाजन यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांचीही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'बारामती येथील प्रचाराच्या समारोपाच्या सभेत असे काय घडले की, रोहित पवार दोन-तीन शब्द बोलले आणि लगेच रडायला लागले. दोन-तीन शब्द बोलल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मला एवढेच वाटते की, रडून निवडणुका लढता येणार नाही. त्या जिंकता सुद्धा येणार नाही. लोकांना तुम्ही फार काळ बनवू शकणार नाही. आता तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे. देशाच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे.'

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात किती जागा मिळते. या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. गिरीश महाजन म्हणाले, यासंदर्भात आजच सांगणं कठीण आहे. मात्र मागच्या वेळेचा रेकॉर्ड देखील यंदाच्या निवडणुकीत मोडला जाऊ शकतो. इतक्या चांगल्या जागा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांना महाराष्ट्रात मिळतील उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठच्या आठ जागा महायुती जिंकेल, असा दावाही त्यांनी केला

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com