NCP On Padalkar : पडळकरांनी अजित पवारांची नव्हे तर भाजपची नाचक्की केली!

Gopichand Padalkar statement clears BJP double policy-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
NCP agitation at Dhule
NCP agitation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Dhule NCP News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याविषयी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद धुळे येथे उमटले. संतप्त पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांच्या तोंडून भाजपनेच असे विधान केले असावे. कारण त्यांचे नेते सतत अशा ढोंगी व वाचाळ व्यक्तीची पाठराखण करीत आले आहे. (NCP workers booted Gopichand Padalkar`s icon-sd67

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी धुळे (Dhule) शहरात भाजप(BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी कार्यकर्ते अत्यंत संतप्त झाले होते.

NCP agitation at Dhule
Maratha Reservation Issue : ...तर समता परिषद गावागावांत आंदोलन करील!

शहर-जिल्हाध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवार गटाचे कैलास चौधरी यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहराची वाट लावल्याचा आरोप केला.

शहराध्यक्ष चौधरी या वेळी म्हणाले, भाजपचे आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले. पडळकरांना कुणाबद्दल काय बोलावे याचे भान नाही. त्यांच्यासारख्या वाचाळवीरांमुळे सरकारची नाचक्की, बदनामी होते.

भाजपने आता आवर घालावा. भाजप काय कारवाई करते, याची आम्ही वाट पाहतो आहे. अन्यथा गणेशोत्सवानंतर पडळकरांना काळे फासू, असा इशारा चौधरी यांनी दिला. या प्रकरामुळे धुळे शहरात राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दरी वाढली आहे.

NCP agitation at Dhule
Nashik NCP News: सरकारने राज्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com