राष्ट्रवादीने दिला राज्यपालांना थेट इशारा!

महाराष्ट्राला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी होशियारी शिकवू नये हेच बरे.
Governer Bhagatsingh Koshyari
Governer Bhagatsingh KoshyariSarkarnama

नाशिक : महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी नेहमीच वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्यांचा अवमान करण्याचा धडाका सुरु ठेवला आहे. प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांची बाजू सावरतात. याचा अर्थ काय? कोणाच्या इशाऱ्यावरून राज्यपाल असे करतात. त्यांना केंद्राने (Centre Government) मराठी माणसांचा अपमान करण्यासाठी पाठवले आहे काय?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भमारे (Anita Bhamre) यांनी केला आहे. (NCPquestioned, Why Governers continuesly making controversial Statements)

Governer Bhagatsingh Koshyari
गिरीश महाजनांनी सत्तेच्या मस्तीतून अत्यंत हीन पातळी गाठली!

यासंदर्भात श्रीमती भामरे म्हणाल्या, राज्यपालांना जाणीवपूर्वक तर महाराष्ट्राविषयी वादग्रस्त विधाने करायची नसतात ना? असा संशय यावा अशी स्थिती आहे. मात्र कोश्यारींनी अधिक होशियारी शिकवू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

Governer Bhagatsingh Koshyari
Girish Mahajan on Eknath khadse : 'खडसेंच्या मुलाचं काय झालं, आत्महत्या की खून?'

त्या म्हणाल्या, डॅा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दिक्षांत समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात सबंध देशाचे स्फूर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले.

त्या पुढे म्हणाल्या, कोश्यारींनी विद्यार्थ्यांना आता तुमचे आदर्श कोण? असा प्रश्न विचारल्यावर `शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी. आता नव्या युगाचे नितीन गडकरी शिवाजी महाराज आहेत` असे वादग्रस्त विधान केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची थेट तुलना नितीन गडकरींशी केल्याने महाराष्ट्रातील जनतेत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

राज्यपाल राज्याचे प्रथम नागरिक असतांना देखील हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यातून त्यांना नेमका काय आनंद मिळतो देव जाणो. यापूर्वीही त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. अती शहाणा त्याचा बैल रिकामा या उक्तीनूसार राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला अधिक होशियारी शिकवण्याची गरज नाही. आता बर्‍या बोलाने क्षमा मागा आणि आपले फाजिल ज्ञान आपल्या जवळच ठेवा.

राज्यपाल यांनी अशी विधाने करायला नको होती. त्यातून निश्चितच क्षोभ होतो. एरव्ही फुटकळ विधानांवर ओरडणारे आता कुठे लुप्त झालेत, ते कळत नाही. राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा जनता हात धरून त्यांना महाराष्ट्राबाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, एवढे लक्षात असू द्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com