सरकार सुविधा देतंय... पोलिसांनी जनतेला चांगली सेवा द्या!

जळगाव येथील पोलिस मुख्यालय इमारतीचे उद्‌घाटन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
Home Minister Dilip Walse Patil

Home Minister Dilip Walse Patil

Sarkarnama

जळगाव : पोलिसांचे (Police Department) राहणीमान उंचवावे, त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. सरकार आपल्याला चांगल्या सुविधा पुरवत आहे. पोलिसांनी जनतेला चांगली सेवा द्यावी, असा संदेश राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Deelip Walse-Patil) यांनी पोलिस दलाला दिला.

<div class="paragraphs"><p>Home Minister Dilip Walse Patil</p></div>
सर्व गोष्टी पैशाने नव्हे तर समाज उभा राहिल्यावर काम उभे राहते!

जळगाव जिल्‍हा पोलिस दलातर्फे उभारण्यात आलेल्या २५२ सदनिकांच्या सहा इमारतींचे उद्‌घाटन सोमवारी गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. सदनिकांच्या चाव्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर, निवासस्थान आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

गृहमंत्री पाटील म्हणाले, की ताणतणावात ड्यूटी करत असताना पोलिसांना राहण्याची व्यवस्था चांगली नसेल, तर कुटुंबसुद्धा आनंदी राहू शकत नाही. परिणामी पोलिस कुटुंबीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. उपमहानिरीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे जळगाव शहरासह प्रत्येक तालुक्यात पोलिस निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Home Minister Dilip Walse Patil</p></div>
देवीदास पिंगळेंनी भाजपच्या दिनकर पाटील पॅनेलचा उडवला धुव्वा!

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असा अपप्रचार करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम एकट्या पोलिस अधीक्षकांचे नसून संबंधित पोलिस निरीक्षक, पोलिस ठाण्यातील अंमलदार आणि एकूणच सर्व पोलिस दलाची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात कुणी आडवे येत असेल, तर कठोर कारवाई करा, असा संदेशही त्यांनी दिला.

टाइम बॉऊडिंग कार्यक्रम

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांसह पोलिस उपमहानिरीक्षकांसमवेत आढावा बैठक घेतली. नाशिक परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था आणि अमली पदार्थ तस्करीबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

गृहमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांची बैठक घेतली. बैठकीत तस्करीवर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. मुद्दाम सरकाला बदनाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यापुढेही सरकारला बदनाम करण्यासाठी असामाजिक तत्त्व कार्यान्वित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी अराजक तत्त्वांवर वेळीच योग्य पावले उचलून कठोर कारवाई करावी अशा सुचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, महापैार जयश्री महाजन, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com