Trible News: आदिवासींची स्वतंत्र जनगणना करावी!

महाराष्ट्रातील आदिवासी नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या.
Trible leaders at Presidents House
Trible leaders at Presidents HouseSarkarnama

नाशिक : आदिवासींच्या (Trible) विविध समस्यांकडे लक्ष वेधत महाराष्ट्रात (Maharashtra) ५ व्या अनुसूचीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदिवासींची स्वतंत्र जनगणना (Census) करण्यात यावी., अशी मागणी राज्यातील आदिवासी नेत्यांनी राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याकडे केली. (Trible leaders meet President of india for greetings-sd67)

Trible leaders at Presidents House
Uday Samant: संभाजी महाराजांबाबत जे झालं ती गद्दारी नाही का?

राज्यातील विविध आदिवासी संघटना व नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून आपण आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्याने शुभेच्छा दिल्या.

Trible leaders at Presidents House
MVP Election: मविप्र संस्थेत बाह्य शक्तींना येऊ देणार नाही!

निवेदनातील मागण्यांत, मरांग गोमके जयपालसिंह मुंडा यांचा इतिहास देशातील प्रत्येक राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात घेण्यात यावा. आदिवासींची स्वतंत्र जनगणना करून आदिवासी धर्मकोड ७ लागू करण्यात यावा. देशातील प्रत्येक राज्यात आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर जमिनींचे हस्तांतर थांबवून पीडित आदिवासींना न्याय मिळावा.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ ला दिलेल्या निकालात खऱ्या आदिवासींच्या बोगसानी बळकावलेल्या जागा रिक्त करून त्यावर खऱ्या आदिवासींची पदभरती करावी यासंदर्भात निकाल दिलेला आहे. परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करुन महाराष्ट्र शासनाने अद्यापही निकालाची अंमलबजावणी केलेली नाही. त्या निकालाची अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील आदिवासींची २०१७ मधील रखडलेली विशेष पदभरतीची अंमलबजावणी करण्यात यावी, मरांग गोमके जयपाल सिंह मुंडा यांना भारतरत्न मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, अखिल भारतीय आदिवासी प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र मोघे, रामसाहेब चव्हाण, गणेश गवळी, सोमनाथ खोटरे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com