Gram Panchayat Election : मतदान केंद्राबाहेर तरुणावर चाकू हल्ला; मध्यस्थीस गेलेला तरुणाचा भाऊदेखील जखमी

Ahmednagar News : जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या
Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक जेवढी चुरशीची होत नाही तेवढी चुरशीची आणि मोठी चढाओढ ही ग्रामपंचायत निवडणुकीत असते. राज्याबरोबरच आज नगर जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. किरकोळ वादावादी काही ठिकाणी झाली असली तरी राहुरी तालुक्यातील एक ग्रामपंचायत वगळता इतरत्र कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

राहुरी मध्ये मात्र एका गावात मतदानास आलेल्या मतदारावर मतदान केंद्राच्या बाहेरच चाकूसारख्या हत्याराने हल्ला करून जखमी करण्यात आले, तर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या भावावरही हल्लेखोराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Election News
PhD on Modi : वाराणसीच्या नजमा परवीन ठरल्या पंतप्रधान मोदींवर 'PhD' करणाऱ्या पहिल्या मुस्लीम महिला!

आज राहुरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान पार पडले. त्यात राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील ग्रामपंचायत मतदान केंद्र बाहेर महेश मच्छिंद्र उंडे (वय ३४ राहणार शिलेगाव) हा तरुण त्याच्या भावासोबत मतदान केंद्राजवळ आला होता. या वेळी गावातीलच परशुराम धनाजी कोळसे याने महेश उंडे यांच्यावर चाकूसारख्या हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात उंडे यांच्या कमरेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

या वेळी महेश उंडे यांना सोडवण्यासाठी योगेश उंडे त्याचा भाऊ योगेश उंडे हा मध्ये आला असता, त्यालादेखील हाताला जखम झाली आहे. जखमी महेश उंडे यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे डॉक्टर विशाल आमरे यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून चार टाके करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवले आहे.

Gram Panchayat Election News
Jyoti Waghmare News : ''एल्विश यादव हा काही आमचा जावई नाही'' - ज्योती वाघमारे विरोधकांवर कडाडल्या!

दरम्यान, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत गावात शांतात प्रस्थापित केली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. 'मतदानाला का आला' असे म्हणत चाकूने हल्ला केल्याचे महेश उंडे यांनी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com