Gram panchayat election result : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

मोहाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
Mohadi Garm Panchyat Election
Mohadi Garm Panchyat ElectionSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) गुजरातचे (Gujrat) प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (C. R. Patil) ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर (Jamner) तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांचे ग्रामविकास पॅनेल मात्र पराभूत झाले आहे. दुसऱ्या गटाने उभा केलेल्या भाजपप्रणित उन्नती पॅनेलचा विजय झाला आहे. भाजप प्रणित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी पाटील यांच्या कन्येच्या पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा हा तालुका आहे. मोहाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. (Gujarat BJP State President C. R. Patil's daughter's Vijay; But the defeat of the panel)

जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचयातीत गुजरात येथील भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील याचे पॅनेल उभे होते. विशेष म्हणजे भाजपच्या विरूध्दच त्यांनी आपले ग्रामविकास पॅनेल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष होते. यामध्ये सी. आर. पाटील यांच्या कन्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनल पराभूत झाले आहे. तसेच, त्यांच्या ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवासुध्दा पराभूत झाल्या आहे. या ठिकाणी भाजपप्रणित उन्नती पॅनलच्या चंद्रकला रघुनाथ कोळी या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

Mohadi Garm Panchyat Election
मोठी बातमी : बालेकिल्ल्यातच फडणवीसांना झटका; दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीची सत्ता

सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या गेल्या वेळी मोहाडी गावच्या सरपंच होत्या. या वेळी त्यांनी भाजपप्रणित उन्नती पॅनेललचा आव्हान दिले होते. उन्नती पॅनेलचे प्रमुख शरद पाटील होते. गेल्या पाच वर्षांत गावात जी हुकूमशाही होती, त्याला जनतेचा धक्का दिला असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Mohadi Garm Panchyat Election
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; सात ग्रामपंचायती जिंकल्या

दरम्यान, या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे. गेल्या पाच वर्षांत गावाने जी हुकूमशाही पाहिली, त्याचा या निवडणुकीत अस्त झाल्याची प्रतिक्रिया लोकशाही उन्नती पॅनेलचे प्रमुख शरद पाटील यांनी विजयानंतर दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com