Nashik News: नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी येत्या मंगळवारी होत आहे. मात्र त्याआधीच आपल्या पक्षाच्या उमेदवाराला किती आघाडी मिळेल, हे एका आमदाराने चक्क कागदावर लिहून दिले आहे. नाशिक मतदार संघात महायुतीचे पाच आमदार आहेत. या सर्व आमदारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde )यांनी विश्वास टाकला होता. त्यासाठी त्यांना खास रसद पुरवण्यात आली होती.
महायुतीच्या यंत्रणेसोबतच आमदारांच्या मतदारसंघात त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते आणि समर्थक सक्रिय असतात. या सगळ्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी विविध तंत्र वापरण्यात आली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा एक विशेष फंडा नाशिकमध्ये वापरण्यात आला होता. तो सध्या चर्चेचा विषय आहे.
नाशिक शहरात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत. या तीन आमदारांना सक्रिय करण्यासाठी शेवटच्या आठवड्यात विशेष प्रयत्न करण्यात आले. या आमदारांनीही प्रचारात भाग घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान झाले असा दावा या आमदारांनी केला आहे.
याबाबत आकडेमोड करून मतदानाच्या माहितीची देवाण-घेवाण होत असते. मात्र शहरातील एका महिला आमदाराने चक्क कागदावर आकडेमोड करून कोणत्या भागातून किती मते मिळणार, याचा हिशेब मांडला. हा हिशेब त्यांनी लिखित स्वरूपात उमेदवाराला दिला. मुस्लिम बहुल मतदारांची संख्या लक्षणीय असूनही येथे महायुतीला वीस हजारांचे आघाडी मिळेल असा हा लिखित दावा आहे.
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या या आत्मविश्वासामुळे कार्यकर्त्यांनाही चांगलाच हुरूप आला. त्यामुळे शहरातून वीस हजार मतांची आघाडी मिळणार असा त्यांचा ठाम दावा आहे. खुद्द उमेदवार देखील त्यावर अश्वस्त आहेत. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यां मध्ये सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.