Eknath Shinde Politics: युती धर्म वाऱ्यावर, शिंदेंच्या शिलेदारांचा अजितदादांच्या उमेदवाराला दे धक्का!

Hemant Godse; Shiv Sena Shinde Party threatened NCP Ajit Pawar, poll numbers have spoken truth-माजी खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर यांच्या भागात शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराला मिळाली भरघोस मते चर्चेचा विषय.
Vijay Karanjkar, MLA Saroj Ahire & Hemant Godse
Vijay Karanjkar, MLA Saroj Ahire & Hemant Godsesarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs NCP News: देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. मात्र महायुतीच्याच नेत्यांनी त्यांच्या मार्गात काटे पेरल्याचे उघड झाले आहे. शिवसेना शिंदे गटाने युतीचा धर्म पाळला नाही, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.

मतांच्या आकडेवारीतून झालेले मतदान व उमेदवारांना मिळालेली मते यातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या दुटप्पीपणाचे वास्तव पुढे आले आहे. माजी खासदार हेमंत गोडसे आणि भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांच्या गावात झालेल्या मतदानातून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. अर्थात शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न करूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे या शिवसेना शिंदे गटाच्या प्रभावक्षेत्रातही पुढेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vijay Karanjkar, MLA Saroj Ahire & Hemant Godse
Nashik BJP : नाशिकच्या `या` आमदाराचा खणखणीत इशारा, बंडखोरांना पक्षप्रवेश दिल्यास देणार सामूहिक राजीनामे !

माजी खासदार हेमंत गोडसे यांचे मुळ गाव संसरी आहे. या गावातील बुथ क्रमांक २३९ ते २५२ अशा चार केंद्रांवर सरोज अहिरे यांना १५९९ मते आहेत. त्या पहिल्या क्रमांकावर राहिल्या. मात्र येथे शिवसेनेच्या शिंदे पक्षाच्या आणि उमेदवारी माघार घेण्याची सूचना केलेल्या अहिरराव यांना ४२४ मते मिळाली. अशीच स्थिती देवळाली कॅम्प येथे देखील दिसली. आमदार सरोज अहिरे सात हजार ४६१ मते मिळून त्या पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र येथेही शिंदे सेनेच्या अहिरराव यांना एक हजार ९३३ मते मिळाली आहेत.

Vijay Karanjkar, MLA Saroj Ahire & Hemant Godse
Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विजय करंजकर यांच्या गावातील १६ नगरसेवक शिंदे सेनेत गेले आहेत. या गावांमध्ये सरोज अहिरे यांना सर्वाधीक मतदान झाल्याचे आढळले. त्या पहिल्या क्रमांकावर होत्या. मात्र शिंदे सेनेच्या अहिरराव यांना येथे दोन हजार ४६५ अशी भरघोस मते मिळाली आहेत. ही मते जवळपास आमदार अहिरे यांच्या मतांशी बरोबरी करणारी आहेत.

लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांना आपल्याच देवळाली मतदारसंघातून मानहानीकारक पिछाडीवर जावे लागले होते. येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर राहिले. विधानसभा निवडणुकीत मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार अहिरे यांना सोडण्यात आला होता.

नांदगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना अडचणीची होती. त्यामुळे त्याचा वाचपा काढण्यासाठी देवळाली मतदारसंघात अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांना अपशकूट करण्याचा निर्णय शिवसेना शिंदे पक्षाने घेतला, असे या नेत्यांनीच जाहीरपणे सांगितले होते. त्यातूनच राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली.

श्रीमती अहिरराव यांच्यासाठी शिंदे पक्षाने मोठी रसद देखील पुरवली असेही बोलले जाते. याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याकडून निवडणूक यंत्रणेने १.९८ कोटी रुपयेजप्त केले होते. ही रक्कम कोणासाठी आले हे स्पष्ट नाही. मात्र कारवाईच्या ठिकाणी मंत्रालयातील अधिकारी असलेल्या आणि श्रीमती राजश्री अहिरराव यांच्या भगीनी देखील आढळल्याने, तो देखील चर्चेचा विषय होता.

शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांना वरिष्ठ पातळीवरून सढळ हाताने मदत झाल्याचे बोलले जाते. त्याचाच परिणाम म्हणून शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शेवटच्या टप्प्यात उत्साह संचारला होता. त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता अनधिकृत असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार अहिराव यांच्यासाठी बरीच धावपळ केली. या नेत्यांच्या बूथवर मिळालेल्या मतांच्या संख्येतूनच हे सत्य बाहेर आले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com