Congress MLA Hiraman Khoskar
Congress MLA Hiraman KhoskarSarkarnama

Congress Politics: 'झेडपी'चे राजकारण विधानसभेत केले, अन् आमदार खोसकर कायमचे बाद झाले!

Hiraman Khoskar Political News : क्रॉस वोटिंग प्रकरणाने आमदार खोसकर यांच्या राजकीय मार्गात आता डेड एंड?
Published on

Hiramank Khoskar News: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केली. त्यात ते आर्थिक आमिषाला बळी पडले हे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसला मिळालेला हा झटका या आमदारांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लावणारा ठरला.

कारवाई होणार असलेल्या या पाच आमदारांमध्ये नाशिकचे आमदार हिरामण खोसकर आहेत. काँग्रेस पक्षाने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळले. काँग्रेस हाय कमांडने या आमदारांचा कायमचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

आमदार खोसकर यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, असे संकेत आहेत. त्यामुळे त्यांना आता उमेदवारीसाठी महायुतीच्या नेत्यांचे पाय धरावे लागतील. असे केले तरीही विधानसभा निवडणुकीत महायुतीला इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचा फारसा प्रतिसाद नाही.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात परंपरागत काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथे गेल्या काही निवडणुका सातत्याने काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा झाल्या आहेत. त्यात कधी काँग्रेसला तर कधी शिवसेना ठाकरे गटाला संधी मिळाली आहे.

Congress MLA Hiraman Khoskar
Ajit Pawar : अजित पवारांच्या दौऱ्याआधीच उदय सांगळे यांनी जाहीर केली उमेदवारी

या स्थितीत आमदार खोसकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राजकीय डावपेचाला खोसकर बळी पडले, असे स्पष्ट झाले आहे. मात्र आमदार खोसकर यांचा एक विशिष्ट राजकीय पॅटर्न आहे. त्यांची कारकीर्द जिल्हा परिषदेपासून सुरू झालेली आहे.

आमदार खोसकर यांचा हा झेडपी पॅटर्न त्यांनी विधानसभेत राबवला. विरोधकांशी चुंबाचुंबी करण्याचे काम त्यांनी जोरात केले. विधानसभा, लोकसभेच्या राजकारणात वैचारीक बांधिलकी आणि पक्षाची राजकीय विचारसरणी सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्याचा त्यांना विसर पडला. त्यांनी स्वतःच्या राजकारणावर कायमची फुती मारून घेतली आहे.

आमदार खोसकर झेडपी राजकारणात तरबेज आहेत. एकाच वेळेस ते सर्व पक्षात वावरतात. सर्व नेत्यांच्या राजकारणात सहभागी होतात. त्याचा लाभ ते घेतात. टेंडर आणि विकास कामे आपल्या बाजूने ते करतात. त्यातून ते चांगले सक्षम झाले आहेत. या सक्षमतेतूनच त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली.

Congress MLA Hiraman Khoskar
Vijaya Rahatkar : विजया रहाटकरांनी भाजप प्रचाराचं स्लोगन सांगितलं; तयारी करा आणि घराघरापर्यंत जा...

आमदार खोसकर काँग्रेस पक्षाचे असले, तरीही ते अनेकदा चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहिले. त्याबाबत पक्षाकडे तक्रारीही झाल्या. विविध विकास कामांच्या नावाखाली त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक वाढवली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी तर खोसकर काँग्रेसमध्ये आहेत, मात्र ते आमचेच आहेत. आजही ते आमच्या बरोबरच आहेत, असे विधान केले होते. नुकताच झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पात आमदार खोसकर यांना २८५ कोटींचा निधी मिळाला आहे. क्रॉस वोटिंग हे त्याचेच फळ आहे.

सत्ताधारी भाजपच्या अनेक आमदारांना ५ ते १० कोटींमध्ये बोळवण करणाऱ्या अर्थमंत्री पवार यांचे विरोधी आमदार खोसकरंवर एवढे प्रेम का, हे काँग्रेसच्या नेत्यांनी खोदून काढले. आता आमदार खोसकर यांची उमेदवारी जवळपास रद्द झाली आहे. त्यामुळे त्यांना वेगळी वाट जोपासावी लागेल. एक प्रकारे हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी डेड एंड ठरू शकतो.

त्यामुळे आमदार खोसकर आणि त्यांचे समर्थक आत्तापासूनच वेगळी वाट चाचपडू लागले आहेत. झेडपीचा पॅटर्न विधानसभेत करायला गेले आणि संकटात सापडले, अशी आमदार खोसकर यांची स्थिती झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com