राज्यसभा निवडणूक : MIM आमदाराला मोठी ऑफर!

धुळ्याचे `एमआयएम`चे आमदार फारूख शेख यांनी (MLA Farukh Shaikh) आपल्याला ऑफर्स आल्याचा दावा करीत खळबळ उडवून दिली.
MLA Farukh Shaikh
MLA Farukh ShaikhSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भारतीय जनता पक्षाकडून (BJP) घोडेबाजार सुरु झाल्याचा दावा, धुळ्याचे `एमआयएम`चे (AIMIM) आमदार फारूख शेख (MLA Farukh Shaikh) यांनी केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात अनिश्चितता व अविश्वासाचे वातावरण निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण होऊ पहात आहे. (AIMIM made allegation on BJP & AIMIM)

MLA Farukh Shaikh
मराठा समाजात छगन भुजबळांसारखे नेते नाहीत याचं वाईट वाटतंय!

यासंदर्भात एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आमदार फारुख शाह यांनी खळबळजनक दावा केल्यानंर त्याचे पडसाद व त्यावर विविध प्रतिक्रीया येण्याची शक्यता आहे.

MLA Farukh Shaikh
महिला आरक्षणाने भाजप महापौर सतीश कुलकर्णींची दांडी उडाली!

याबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडी आणि भाजपकडून घोडेबाजार सुरू झाला आहे. महाविकास आघाडी, भाजप कडून आपल्याला ऑफर्स देखील आल्याचा आरोप करीत त्यांनी याबाबत टिका केली.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. पण सध्याचं विधिमंडळातील संख्याबळ पाहता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची चिन्ह आहेत. “आम्ही घोडेबाजार करणार नाही”, असा दावा महाविकास आघाडी आणि भाजप दोघांकडून केला जातोय. मात्र अशातच एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आमदार शाह यांनी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

सत्तेत असलेली महाविकास आघाडी, भाजपकडून घोडेबाजार सुरू झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. मतदारसंघात विकास निधी वाढवून देतो, अशा ऑफर्स येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com