जळगाव : मी ईडीला (ED) घाबरत नाही. काय घाबरायचं?. आपण आयुष्यात कधीही तसलं (चुकीचे) काम केलेले नाही, त्यामुळे आपण ईडीला घाबरत नाही, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावून सांगितले. (I am not afraid of ED: Sambhaji Raje)
स्वराज्य संघटनेच्या पक्षबांधणीसाठी युवराज संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव (Jalgaon) येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण ईडीला घाबरत नाही, असे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, स्वराज्य पक्ष हा प्रस्थापित पक्षांना टक्कर देईल. राजकारणात साम, दाम आणि दंड नीतीचा अवलंब करावा लागतो. स्वराज्य हा यावर्षीच सुरू झाला आहे. लोकशाही प्रत्येक स्वातंत्र आहे, प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या राजकारणात जी स्पेस निर्माण झाली आहे, ती नक्की व्यापून टाकेल, असा मला विश्वास वाटतो.
महाराष्ट्रात सध्या खालच्या पातळीवरचं राजकारण चालू आहे. या पक्षांच्या राजकारणाला लेाकं कंटाळली आहेत. लोकांन खोके, बोके, मांजरं, डुक्करं आणि कुत्रं ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र घडावा, अशी जनता अपेक्षा करते. राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी स्वराज संघटना नक्कीच भरून काढणार, असा आम्हाला विश्वास वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मी आता खासदार नाही, त्यामुळे लोकशाहीत मी शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मला बोलवावे, अशी मी अपेक्षा करत नाही. विरोधकांनी संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर का बहिष्कार टाकला, ह्या नंतरच्या बाबी आहेत. पण मला एक गोष्ट पटते की, संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधानांबरोबर राष्ट्रपती असत्या तर या कार्यक्रमाची गरिमा आणखी वाढली असती.
गौतमी पाटील हिने आपले आडनाव बदलावे, अशा स्वरूपाच्या धमकी तिला येत आहेत. यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आज केवळ मराठा समाजातच पाटील आडनाव आहे असं नाही. आज अनेक समाजातील लोकंही पाटील अडनाव लावतात. कारण पाटील हा एक किताब आहे. त्यामुळे मी त्यावर बोलून आणखी वाद वाढवू इच्छित नाही. पण, एक कलाकर म्हणून गौतमी पाटील हिला संरक्षण मिळाले पाहिजे, या मताचा मी आहे, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.