वाडीवऱ्हे : इगतपुरी (Nashik) तालुका धरणग्रस्त शेतकरी ए, विस्थापित (Farmers) व बेरोजगारांचा तालुका असून, येथे उभ्या महाराष्ट्राला पाणी पाजण्याची क्षमता असतानाही हा तालुका मात्र ज्वलंत समस्यांनी ग्रासलेला आहे, या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री (Chief Minister) व मंत्रिमहोदयांची भेट घेणार असून, शेतकऱ्यांचा व बेरोजगाराचां प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी दिली. (Congress MLA Hiraman khoskar assures farmers to resolve there issues)
आहुर्ली येथे आमदार खोसकर यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. आहुर्लीजवळील वैतरणा धरण मुंबईसह उपनगरातील शहराची, तर मुकणे धरण नाशिककरांची तहान भागवत आहे. मात्र परिसरातील तरुणांना मुंबई महापालिका व नाशिक महापालिकेत धरणग्रस्तासाठी आरक्षित जागा नाही. या हक्काच्या आरक्षित जागा मिळून स्थानिक धरणग्रस्त युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आपण पुढाकार घेऊन कश्यपी-गौतमीच्या धर्तीवर नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सबंधित मंत्रिमहोदयांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इगतपुरी तालुक्यात ७ जूनला नियोजित दौरा होता. मात्र सदर दौरा पुढे ढकलण्यात आला असून लवकरच शरद पवार तालुक्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जेष्ठ शेतकरी नेते पांडूमामा शिंदे उपस्थित होते.
यावेळी पांडुरंग खातळे, प्रतीक गोवर्धने, प्रविण खातळे, लकी गोवर्धने, म्हसुर्लीचे सरपंच जगन्नाथ पोटकुले, शेवगेडांगचे सरपंच साहेबराव खंडवी, सांजेगावचे सरपंच शंकर गोवर्धने, कुंडलिक जमधडे, उमेश खातळे, रामदास जमधडे, तुकाराम गायकर, भाऊसाहेब गायकर आदी उपस्थित होते.
आहुर्लीसह परिसरातील तब्बल वीस ते बावीस गावांतील जमिनी शासनने आहुर्ली सॅडल डॅम मातीखाणीसाठी संपादित केल्या. मात्र २५ टक्के जमिनीतून माती घेतली. उर्वरित जमिनी वापराअभावी पडून असलेल्या व मूळ मालक वा त्यांच्या वारसदाराचा ताबा असलेल्या संपादित जमिनी पाटबंधारे खात्याकडुन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच या जमिनीही मुळ मालकांना मिळवून देऊ.
-आमदार हिरामण खोसकर.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.