स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे, शेळ्या, बकऱ्या मोजता, मग ओबीसी माणसे का मोजत नाही?

धोंडवीरनगर (ता.सिन्नर) येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.
Chhagan Bhujbal & Pankja Munde
Chhagan Bhujbal & Pankja MundeSarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी तळागाळातील समाजघटकांसाठी खुप काम केले. त्यांना त्यांच्याविषयी प्रेम होते. त्यामुळे आज केंद्रात ते असते तर ओबीसी आरक्षणाच्या विषयावर नक्की तोडगा निघाला असता, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

Chhagan Bhujbal & Pankja Munde
सकाळी भुजबळांचे कौतुक करून दुपारी पंकजा मुंडे सुहास कांदेंना भेटल्या!

धोंडवीरनगर (सिन्नर) येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे यांच्या निधीतून महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे पुतळ्याचे अनावरण श्री. भुजबळ आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal & Pankja Munde
शेतकरी जिंकले! हरियानात भाजपला दे धक्का

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबतची बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तोलामोलाचा अन्य कुठलाही नेता केंद्रात नाही. स्वर्गीय मुंडे असते तर आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत मार्ग निघाला असता. त्यामुळे जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र मोजणी व्हावी या मागणीसह केंद्र सरकार घटनादुरुस्तीसह ओबीसी आरक्षण देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाची लढाई थांबणार नाही. ओबीसी आरक्षणाची लढाई पन्नास वर्षांहूनही आधीपासून सुरू आहे. सन १९३१ च्या दशवार्षिक जनगणनेत ओबीसींचे प्रमाण ५४ टक्के होते. त्यामुळे त्यांच्या ५० टक्के म्हणजे २७ टक्के आरक्षण देण्यात आले असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, माझ्या अडचणीच्या काळात धोंडवीर नगर हे गाव माझ्यामागे उभे राहिले. नाशिकमध्ये माझ्या समर्थनासाठी दहा-बारा लाखांचा मोर्चा निघाला. त्यात या गावांमधील लोकही सहभागी झाले होते. माझ्या कुटुंबामागे हे गाव उभे राहिले म्हणून या गावाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आलो आहे. संकट काळात कोण आपला? कोण कामापुरता आलेला आहे ते सर्व समजते, असे म्हणत ‘वक्त दिखाई नही देता, लेकिन वक्त बहुत कुछ दिखा देता है’.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपसभापती संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे, डॉ. व्ही. एम. अत्रे, राजेंद्र जगझाप, पांडूशेठ केदार, चंद्रकांत वरदळ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय काकड, डॉ. जी. एल. पवार, राजेंद्र जगझाप, सरपंच शिवाजी सोनवणे, उपसरपंच संजय पवार, सदस्य मंगलाताई पवार, माजी सरपंच भाऊसाहेब पवार, निवृत्ती पवार, डॉ. संदीप लोंढे, राजेंद्र भागात आदी उपस्थित होते.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com