CPI Politics: भाजपचे 'ते' दहा आमदार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे टार्गेट!

India front politics; CPI demands 16 seats for Maharashtra assembly election-भारतीय कम्युनिस्ट पक्षाने इंडिया आघाडीकडे महाराष्ट्रातील १६ जागांची मागणी केली
Sharad Pawar with CPI delegation
Sharad Pawar with CPI delegationSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News: भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. या संदर्भात पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत विधानसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी हा भाजपचा प्रमुख विरोधी घटक आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी असल्याने त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षासह विविध नवे पक्ष देखील आहेत. या पक्षांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये स्थान हवे आहे.

त्यासाठी या पक्षांनी दबाव वाढविण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी १६ मतदारसंघांवर आपला दावा केला आहे. त्यात भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे हे आपले उद्दीष्ट असल्याचा पुनरूच्चार केला.

भाकपचे मुख्य लक्ष्य भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हे आहे. त्यामुळे जागा कमी मिळाल्या तरी चालतील मात्र इंडिया आघाडी म्हणून महायुतीला आव्हान देण्याची तयारी त्यांनी केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दावा केलेल्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या दहा मतदारसंघांचा दावा आहे.

Sharad Pawar with CPI delegation
Girish Mahajan Politics: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यंदा जामनेरच्या चक्रव्यूहात अडकणार?

भाजपच्या या दहा आमदारांमध्ये वणी (यवतमाळ), हिंगणा, शिरपूर, विक्रमगड, शेवगाव- पाथर्डी, औरंगाबाद मध्य हे प्रमुख मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटप करताना या १६ जागांचा विचार करून त्यापैकी काही जागा भाजपला सोडवाव्यात अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबईत भाकपचे नेते भालचंद्र कांगो, सचिव ॲड सुभाष लांडे, राजू देसले, सुकुमार दामले, राज्य सचिव मंडळ सदस्य श्याम काळे, मिलिंद रानडे, अशोक सूर्यवंशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

डाव्या आघाडीतील भाकप, माकप, शेकाप आणि अन्य पक्ष महाविकास आघाडीत समाविष्ट होऊ शकतील. काही मतदारसंघ प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पाणी सोडावे लागणार आहे. या पक्षांच्या इच्छुकांची त्यासाठी तयारी असेल का? हा नेत्यांपुढे मोठा अडचणीचा प्रश्न आहे.

Sharad Pawar with CPI delegation
Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे गटाची विधानसभेची आक्रमक तयारी की स्वबळाचे संकेत?

या जागा वाटपामुळे गेले वर्षभर विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या नेत्यांचे पक्षांतर होण्याचा देखील धोका आहे. या स्थितीत काही ठिकाणी महायुतीला अपेक्षित लाभ होऊ शकतो. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने महाविकास आघाडीसह सर्वच घटक पक्षांच्या जागा वाटपावर खलबते सुरू आहेत. त्यात आता डाव्या आघाडीच्या घटक पक्षांची भर पडली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com