Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे गटाची विधानसभेची आक्रमक तयारी की स्वबळाचे संकेत?

Nashik Central Constituency : जागा वाटपाआधीच आक्रमक शिवसेनेने नाशिक मध्य मतदारसंघात प्रचार सुरू केल्याने काँग्रेसची कोंडी.
Vasant Gite & Aditya Thackrey
Vasant Gite & Aditya ThackreySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच कायम आहे. त्यामुळे इच्छुक गोंधळलेले आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गट मात्र अत्यंत आक्रमक झाला आहे. आज नाशिक मध्य मतदारसंघात आदित्य ठाकरे प्रचाराची सुरवात करत आहेत.

नाशिक मध्य मतदार संघ हा शहरातील अतिशय प्रतिष्ठेचा मतदार संघ आहे. गेली दोन टर्म तो भाजपकडे आहे. अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतांच्या तोडीस तोड येथे बहुजन समाजाचे मतदार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना हा मतदारसंघ अनुकूल वाटतो.

या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष थेट प्रचारालाच लागला आहे. या पक्षाने माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी द्यावी असा ठराव देखील एक मताने मंजूर करून पक्ष नेत्यांना पाठविला. तुलनेत काँग्रेसचे इच्छुक एकमेकांविरोधातच राजकारण करण्यातच व्यस्त आहेत.

आज शिवसेना नेते आमदार, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी माजी महापौर आणि संभाव्य उमेदवार वसंत गीते यांनी केली आहे. त्यांच्या समर्थकांनी गेले आठवडाभर विविध भागात जाऊन मिळावे घेतले आहेत.

Vasant Gite & Aditya Thackrey
Advay Hire Politics: अद्वय हिरे यांनी कोणत्या मंत्र्याला गद्दार म्हटले?

मतदार नोंदणीची मोठी मोहीम देखील शिवसेना ठाकरे गटाने राबविली. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची आजची सभा म्हणजे निवडणूक प्रचाराचा बिगुल असे मानले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे.

आजच्या मेळाव्यामुळे मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा अधिक पक्का होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे स्थानिक इच्छुक आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी देखील या मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. गेले महिनाभर त्यांनी नव्या मतदार नोंदणीसाठी मोहीम राबवली.

Vasant Gite & Aditya Thackrey
Girish Mahajan Politics: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यंदा जामनेरच्या चक्रव्यूहात अडकणार?

अल्पसंख्यांक आघाडीचे हनीफ बशीर, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील, प्रा. नागरगोजे अशा विविध इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाचा स्पष्ट संकेत मिळेपर्यंत या इच्छुकांची स्थानिक पातळीवर गाठीभेटी घेण्यावर भर आहे.

शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले होते. पक्षाचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचारात आघाडीवर होते. अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये देखील प्रचाराची सूत्रे प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे ठेवली होती.

काँग्रेस राष्ट्रवादी पारंपारिक पद्धतीने राजकारण करीत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने महायुतीला आणि विशेषता भाजपला थेट आव्हान दिले होते. त्यामुळेच मतदारांमध्ये अनुकूल संदेश गेला.

विधानसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेना ठाकरे गट तेवढ्याच आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. उमेदवार निवडीसाठी त्यांनी आधीच धोरण निश्चित केलेले आहे. त्यांची तयारी म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी अन्य पक्षांचे काहीही असले तरी प्रसंगी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागल्यास ती तयारी देखील झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या आक्रमक धोरणापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कितपत निभाव लागेल हा चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com