Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

Jalgaon Politics : एकनाथ खडसे यांच्या पॅनलच्या सर्व जागा आघाडीवर आहेत
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Bodwad Market Committee Result : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड बाजार समितीत खडसे यांच्या नेतृत्वाखालील गट आघाडीवर आहे. या गटाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत, तर सोसायटी मतदार संघातील आणि इतरही सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (shivsena) भाजपचे पॅनल पराभवयाच्या छायेत आहे. जळगाव जिल्ह्यात बोदवड बाजार समिती अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मतदार संघातील ही बाजार समिती आहे.

Eknath Khadse
Jalgaon Bazar Samiti Result : जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने खाते उघडले; दिलीप काशिनाथ कोळी विजयी

या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल होते. तर शिंदे गटाचे मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) पॅनल होते. आज होत असलेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत मतदार संघातून दोन जागा तर हमाल मापाडी मतदार संघातील एक जागा अशा तीन जागा खडसे गटाच्या निवडून आल्या आहेत.

तर सोसायटी मतदार संघात मतमोजणी सुरू असून या ठिकाणी सर्व जागावर खडसे गट आघाडीवर आहे. व्यापारी मतदार संघातील दोन व ग्रामपंचायत मतदार संघातील दोन जागांवरही खडसे गटाने आघाडी घेतली आहे.

Eknath Khadse
Ner APMC Election Result : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस गमावले, पण नेरमध्ये मिळवला विजय !

दरम्यान, जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खाते उघडले आहे. दिलीप काशिनाथ कोळी हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये येथे काटेकी टक्कर आहे. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com