Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : निकालानंतर जळगाव राष्ट्रवादीत भडका; शरद पवार गटाविरोधात गुन्हा

Sharad Pawar group alleges abuse of Ajit Pawar : शरद पवार गटाने अजित पवारांना शिवीगाळ केल्याचा आरोप
Jalgaon
JalgaonSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर आज जळगावात राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने - सामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र शरद पवार गटाने अजित पवारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत अजित पवार गटाचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी रामानंद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयसमोर दुपारी आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी मंगला पाटील, इब्राहीम तडवी, वाल्मीक पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jalgaon
Ncp News : पक्ष अन् चिन्ह गेले; आता 5 आमदार पवारांना धक्का देणार; लवकरच दादा गटात जाणार ?

अजित पवार गटाचा जल्लोष

पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने या गटातर्फे आकाशवाणी चौकात जल्लोष करण्यात आला. त्यांनी ढोल ताश्‍याच्या गजरात अजित पवार आगे बढो... अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांनी पेढे वाटप करीत फटाकेही फोडले. यावेळी अजित पवार गटाचे अभिषेक पाटील, मनीष जैन व योगेश देसले, कल्पना पाटील, मीनल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. घोषणाबाजीमुळे काही काळ वातावरण तंग झाले. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अजित पवार गट पोलिसांत

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर दोन्ही गट आमने - सामने झाल्यानंतर अजित पवार गटाचे पदाधिकारी रामानंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले. पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार गटाने शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिषेक पाटील यांनी तक्रार दिली असून तक्रारीत म्हटले, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित दादा गटाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असताना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी 'निम का पत्ता कडवा हे, अजितदादा भडवा हे' अशा घोषणा देवून अजित पवार यांना शिवीगाळ केली.

त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला धोका होईल अशी प्रक्षोभक भाषणे केल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. यानुसार पोलिसांनी (504, 505, 112, 117 प्रमाणे) शरद पवार गटाचे जिल्हा महानगराध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह इतर दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by Amol Sutar)

Jalgaon
Rohit Pawar News : रोहित पवारांच्या 'त्या' वाक्याने कर्जतमधील 'विजय निश्चय' मेळाव्याचे वातावरण झाले भावनिक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com