Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : 'राज करने आया मैं, झुकेगा नही'; 'शंभर'च्या स्पीडने लंके दिल्लीकडे...

Nilesh Lanke and Sujay Vikhe Politics : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना पिछाडीवर टाकत नीलेश लंके यांनी आघाडी घेतली आहे. मतांची आघाडी मिळताच नीलेश लंके यांच्या हंगा येथील घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sujay Vikhe, Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पहिल्या आठ फेऱ्यांपासून आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे मागे दहाव्या फेरीपूर्वी मागे पडताना दिसत आहेत. नीलेश लंकेंनी घेतलेल्या मतांच्या आघाडीमुळे विखे यंणत्रेसह भाजपच्या पोटात गोळा आला आहे. मताची ही आघाडी मिळताच 'राज करने के लिए आया हूं झुकूंगा नहीं', असचं काहीसा संकेत नीलेश लंके यांनी दिला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाटी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या अटीतटीची लढत सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सुजय विखे मतांबाबत आघाडीवर होते. आठव्या फेरीपर्यंत सुजय विखे दहा हजारांचे मताधिक्य घेऊन पुढे जाताना दिसत होते. पहिल्या आठ फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी मिळत नसल्याने विखे यंणत्रा आणि भाजपमध्ये काही गंभीर वातावरण होते. असे असतानाच नीलेश लंके यांनी आठव्या फेरीनंतर साडेनऊ हजार मतांची आघाडी घेतली.

नगरमध्ये मतमोजणी सुरू आहे.परंतु नीलेश लंके हंगा (ता. पारनेरमध्ये) येथील घरी बसून कार्यकर्त्यांनी आणलेली कामे मार्गी लावत आहेत. निकालाच्या उत्सुकतेमुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी देखील केली आहे. आठव्या फेरीपर्यंत लीड मिळत नसल्याने लंके यांच्या घरासमोर बसलेले कार्यकर्त्यांमध्ये तणाव होता. पंरतु आठव्या फेरीनंतर लंके यांनी 11 हजार मतांचा लीड घेतला. मताधिक्याची खबर नीलेश लंके यांच्या घरी धडकताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडून, ढोलीबाजा लावून नाचत होते. काहींनी गुलाल उधळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : विखे-लंके लढतीचा एक्झिट पोल काही असो, पण मोठे विखे निकाल पलटवणार?

नीलेश लंके यांनी यानंतर लगेच हंगाचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अगदी साध्या पद्धतीने नीलेश लंके कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले होते. नगर दक्षिणमध्ये सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्या 'कांटे की टक्कर' दिसते आहे. नीलेश लंके यांना हा लीड मिळताच, त्यांना दिल्लीत जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी भावना जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. हा लीड मिळाल्याची काहींना खात्री होत नव्हती. ती एकमेकांना संपर्क करून खात्री करून घेत होते.

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखे-लंकेंचा महामुकाबला; मतमोजणीला 5 आयपीएस, 8 डीवायएसपी अन् 3 हजार काँस्टेबलचा पहारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com