Mahatma Phule and Savitribai Phule : महात्मा फुले अन् सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण!

Chhagan Bhujbal : - छगन भुजबळ म्हणाले, महात्मा फुले अन् सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करू
Mahatma Phule and Savitribai Phule
Mahatma Phule and Savitribai PhuleSarkarnama
Published on
Updated on

Mahatma Phule and Savitribai Phule sculpture Inauguration : 'महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करू.' असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज(शनिवार) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

Mahatma Phule and Savitribai Phule
Sanjay Shirsat on Anand Dighe Death : 'आनंद दिघे यांचा घात झाला, हे...' ; संजय शिरसाटांच्या वक्तव्याने नवा वाद उफाळणार?

यावेळी मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात १९३१ साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

ते म्हणाले की, मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Mahatma Phule and Savitribai Phule
Devendra Fadnavis : गृहमंत्री फडणवीस म्हणतात, 'एन्काऊंटर फेक नाहीच, कोर्टाच्या टिप्पणीलाही महत्त्व नाही...’

या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय नेटके वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून ब्राँझ धातूचे देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com