नरहरी झिरवाळ म्हणतात, आमदार होणे फारच सोपे, मात्र...

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ म्हणाले, सिंचनाच्या सुविधा झाल्यास आदिवासींची उन्नती होईल.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

घोटी : आमदार होणे अवघड नाही, अंगठेबहाद्दरही आमदार होऊ शकतो. पण यूपीएससी, एमपीएससी या सेवांतून प्रशासनात येण्यासाठी अभ्यासच करावा लागतो. त्यामुळे आदिवासींनी या सेवेत येण्यासाठी शिक्षणाची कास धरावी. आदिवासी हा खरा शास्त्रज्ञ आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

Narhari Zirwal
शरद पवारांच्या भेटीत उजळले शंभरीतील माजी आमदारांचे ऋणानुबंध!

ते म्हणाले, राज्यात आदिवासींसाठी विविध योजनांतर्गत अर्थसंकल्पातील तरतूद फक्त साडेनऊ टक्के आहे, आदिवासींच्या सर्वागिण विकासासाठी ही तरतूद वाढविण्याची आता नितांत गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

सोनोशी (ता.इगतपुरी) येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व घरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बिरसा मुंडा ब्रिगेडतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Narhari Zirwal
मालेगाव दंगल; `राष्ट्रवादी`चे नगरसेवक अय्याज हलचल अटक, जनता दलाचे मुश्तकीन डिग्नीटींचा शोध

ते पुढे म्हणाले,‘समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगत शिक्षणात आदिवासी पुढे येऊ लागला आहे. राज्यात नवोदय विद्यालय संख्या वाढवणे गरजेचे आहे. आतापर्यत ३८ वेळा बजेट मांडण्यात आले, आदिवासी लोकसंख्येच्या आधारे ९.३५ टक्के बजेटमध्ये तरतूद करण्यात येत आहे, ती वाढवणे गरजेचे झाले आहे.

ते म्हणाले, आदिवासी भागात विकासापासून वंचित नागरिक स्थलांतरित होतात. या परिसरात सिंचनाच्या अधिक सोयी उपलब्ध करून वळण बंधारे यांच्यावर भर दिल्यास आदिवासींची पीकपद्धती बदलून सामाजिक आर्थिक विकास आपल्याला साधता येईल. वनपट्टे दोन गुंठे, चार गुंठे दिले जातात, हे योग्य नाही. आदिवासी गुंठ्याभरात घर बांधेल का? शेती करेल आणि साठ गुंठे असल्याशिवाय कृषी विभागाकडून विहिर दिली जात नाही. कायद्यात सुधारणा करण्यासाठी शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली.

आमदार होणे फारच सोपे...

आमदार होणे अवघड नाही, अंगठेबहाद्दरही आमदार होऊ शकतो, पण यूपीएसी, एमपीएससी साठी अभ्यासच करावा लागतो, त्यामुळे आदिवासींनी या सेवेत येण्यासाठी शिक्षणाची कास धरावी. आदिवासी हा खरा शास्त्रज्ञ आहे असे सांगताना कोरोनाच्या काळात सुशिक्षित लोक सॅनिटायझर वापरत असताना आदिवासी बांधवांनी शंबर टक्के अल्कोहोल असलेल्या डोंगरावरील महुच्या फुलांचा वापर करत कोरोनापासून संरक्षण केल्याचा दाखला त्यांनी दिला. आदिवासी आद्य क्रांतिकारकांच्या जयंती उत्सव वेगवेगळ्या तारखांना साजरा करणे अवघड आहे, त्यासाठी मी शासनास ९ ऑगस्ट संयुक्त जयंती उत्सव साजरा करावा अशी मागणी करणार आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com