Praniti Shinde : "हे संकट सर्व अल्पसंख्यांकांवर येणार..."; वक्फ बिलाचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

Praniti Shinde's Remarks on Democratic Crisis : लोकशाही आणि राज्यघटना यावर देशभरात मंथन सुरू आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या दोन्ही संस्था संकटात टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्षीण असला तरी सामान्यांनांच आवाज उठवावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.
Amit Shah, Praniti Shinde
Amit Shah, Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 12 Apr : लोकशाही आणि राज्यघटना यावर देशभरात मंथन सुरू आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या दोन्ही संस्था संकटात टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्षीण असला तरी सामान्यांनांच आवाज उठवावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.

सध्याचे सत्ताधारी सबंध देशाचा सांस्कृतिक आणि विविधतेचा वारसा नष्ट करीत आहेत. त्यांना येथे वाद आणि हिंसेचे विष पेरायचे आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. नाशिक येथील गौतम सुराणा यांनी आयोजित केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेत प्रणिती शिंदे यांनी लोकशाही या विषयावर भाषण केलं.

भगवान महावीर यांचा मुख्य विचार परस्पर संवाद, अहिंसा आणि सामाजिक सद्भाव हा आहे. आजच्या स्थितीत मात्र प्रत्येक महापुरूष विशिष्ट घटकांपुरताच मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो. या दृष्टीने विरोधातील आवाज क्षीण आणि अल्पसंख्यांक आहे. मात्र त्यांनी आजच्या संकटाला उत्तर दिलेच पाहिजे.

Amit Shah, Praniti Shinde
Shivsena UBT Politics : विधानसभेला त्याग केलेल्या सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलं निष्ठेचं फळ; 'या' महत्त्वाच्या पदी केली नियुक्ती

आपल्या देशात अनेक धर्म व त्यांचे अनुयायी आहेत. अनेक प्रकारची धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे. निधर्मीपणा हा त्यातील महत्त्वाचा गाभा आहे. जगात अशी सुंदर संस्कृती आणि विविधता कुठेही नाही. मात्र हे वैशिष्ट्यच नष्ट करण्याचा प्रयत्न आज जाणीवपूर्वक होत आहे. हाच सत्ताधाऱ्यांचा डाव देखील आहे.

आज लोकशाहीला आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. धोका प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्ही सर्व धर्म समभाव जोपासणारे किंवा मानणारे असाल तर तुम्ही हिंदूच नाही असा शिक्का जबरदस्तीने तुमच्यावर मारला जात आहे. हा वैचारिक मतभेद आणि वेगळेपणाचा धाक निर्माण करून समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत.

Amit Shah, Praniti Shinde
Chhagan Bhujbal On Udayanraje : उदयनराजे म्हणाले, मुलींची पहिली शाळा प्रतापसिंहराजेंनी सुरु केली; छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया,'ते राजे आम्ही...'

लोकशाहीत विरोधी पक्ष हा प्रमुख आणि जनतेचा आवाज असतो. पक्षनेता म्हणजे शॅडो ऑफ प्राईम मिनिस्टर मानला जातो. सभागृहात विरोधी पक्ष नेत्याचा माईक कधीही बंधन असतो. मात्र आज संसदेत विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिले जात नाही. विरोधी पक्षांच्या कोणत्याही सूचनेला महत्त्व दिले जात नाही. विरोधी पक्षाची उपेक्षा केली जाते.

हा लोकशाहीला मोठा धोका आहे, असे शिंदे म्हणाल्या. खासदार शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाचा थेट उल्लेख न करता गंभीर टीका केली. आजचे सत्ताधारी जाणीवपूर्वक जनता आणि सगळ्यांचेच दिशाभूल आणि बुद्धिभेद करते. वक्फ बोर्ड हा देखील तसाच विषय आहे. उद्या हे संकट सर्व अल्पसंख्याकांवर येणार आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हावे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com