India PM Oath Taking: PMO मधून फोन आला अन् रक्षाताईंना रडू कोसळलं; नाथाभाऊ कुटुंबासह विमानाने दिल्लीला रवाना..

MP Raksha Khadse Swearing in Ceremony: रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांना मंत्रीमंडळात समावेश होण्याचा पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला...
MP Raksha Khadse Swearing in Ceremony
MP Raksha Khadse Swearing in CeremonySarkarnama
Published on
Updated on

नरेंद्र मोदी आज सांयकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत (prime minister oath ceremony) आहेत. मोदींच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मोंदीच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला मानाचं पान मिळणार असल्याचे दिसते. मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी अनेक खासदारांना 'पीएमओ'मधून कालपासून फोनाफोनी सुरु आहे. महाराष्ट्रातील सहा खासदार मोदी सरकारमध्ये मंत्री असतील, अशी माहिती आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांना केंद्रातील मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) फोन आल्यानंतर त्यांना गहिवरून आले. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ खडसे कुटुंबासह उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.सून केंद्रात मंत्री होत असल्याने नाथाभाऊंना आनंदअश्रू आले.

रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रीमंडळात समावेश होण्याचा पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला.त्या नंतर दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना रडू कोसळले.

त्या म्हणाल्या, "माझ्या सासरे एकनाथराव खडसे यांनी आपल्याला मुलीसारखं सांभाळले. सर्व कुटुंबाने आपल्याला साथ दिली. मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांचा यात मोठा वाटा आहे.

केंद्रात मंत्रीमंडळात सून रक्षा खडसे यांचा समावेश होणार असल्याने एकनाथ खडसे यांनीही आनंद व्यक्त केला. माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनाही आंनदाने गहिवरून आले. आपण दिल्लीत शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MP Raksha Khadse Swearing in Ceremony
Jayant Patil: भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला; जयंतरावांनी सत्ताधाऱ्यांना झोडपले!

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 18 मंत्री असतील तर घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदं असतील, अशी प्राथमिक माहिती आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सहा मंत्रिपदं येतील असे सांगण्यात येत आहे. पीयुष गोयल, नितीन गडकरी, आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले, रक्षा खडसे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com