Gram panchayat Result : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका; निळवंडे ग्रामपंचायतीत दणदणीत विजय!

Gram panchayat Election Result : त्यांच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा रंगली
Gram panchayat Election Indurikar Maharaj
Gram panchayat Election Indurikar Maharaj Sarkarnama

Sangamner Gram panchayat Election Result : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. या पार्श्वभूमीवरच अहमदनगरच्या संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुरंगी लढत झाली होती. यामध्ये शशिकला शिवाजी पवार या विजयी झाल्या आहेत. शशिकला पवार या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाई आहेत.(Indurikar maharaj's mother in law wins grampanchayat election)

शशिकला पवार यांनी त्यांच्या विरोधी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांचा पराभव करत २२७ मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.

तर इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असल्याने निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्या विराजमान झाल्या आहेत.

Gram panchayat Election Indurikar Maharaj
Jalgaon Gram Panchayat Election result : शिंदे-भाजपला धक्का ; मुक्ताईनगर, बोदवडमध्ये खडसेंनी गड राखला

दरम्यान, राज्यभरातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी १८ डिसेंबरला मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

यामध्ये काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या होत्या तर काही अपक्ष लढवल्या होत्या. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com