Jalgaon Gram Panchayat Election result : शिंदे-भाजपला धक्का ; मुक्ताईनगर, बोदवडमध्ये खडसेंनी गड राखला

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायीतकडे लक्ष होते.
Jalgaon Gram Panchayat Election result :
Jalgaon Gram Panchayat Election result :

Jalgaon Gram Panchayat Election result update : जिलह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायती राष्ट्रवादी कडे आल्या आहेत. तर एक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आली आहे.

भाजप-शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही, तर मुक्ताईनगरातील कुऱ्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी ने ताबा मिळविला आहे, तर उंचदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व नऊ उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले मात्र सरपंच पदाचे उमेदवार शिंदे-भाजपगटाच्या पाठींब्यावर निवडून आले आहेत.

Jalgaon Gram Panchayat Election result :
Gram Panchayat Election: भाजप-शिंदे गटात तुफान हाणामारी ; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायीतकडे लक्ष होते. या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीकडे लक्ष होते. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार बी.सी.महाजन विजयी झाले. त्यांनी भाजप-शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव केला. याठिकाणी १३ सदस्य राष्ट्रवादीचे तर चार सदस्य भाजप-शिंदे गटाचे निवडून आले आहेत. तर मुकताईनगर तालुक्यातील उंचदा ग्रामपंचायतीत सर्व नऊ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. मात्र संरपंच पदाच्या उमेदवार भाजप-शिंदे गटाच्या वंदना दिपक गुल्हाणे निवडून आल्या आहे.

बोदवड तालुक्यात वडजी ग्रामपंचयात सरपंचपदी राष्ट्रवादी बिनविरोध निवडून आले आहे. निमावल, धोंडखेडा, चिंचखेडासीम, या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, तर कोल्हाडी ग्रामपंचायतीवर कॉंगेसचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीने येथे बाजी मारलीआहे.शिंदे-भाजप गटाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे व जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी आपले वर्चस्व तालुक्यावर कायम ठेवले आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com