Chhagan Bhujbal: राज्यघटना शाबूत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी!

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दिलेल्या राज्यघटनेने संपूर्ण देश एकसंध बांधला गेला. राज्यघटनेवर महात्मा फुले, (Mahatma Phule) छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या देशाला एकसंध ठेवण्यासाठी आपली राज्यघटना शाबूत ठेवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (Freedom fighters history shall be teach to new generation)

Chhagan Bhujbal
Ramdas Athawale: माझा पक्ष वाढविण्यासाठी भाजप मला मदत करतो

श्री. भुजबळ म्हणाले, की अनेक वीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, भगतसिंग, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेऊन पंचवार्षिक योजनेची घोषणा केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचे पाऊल पडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. अंतराळ क्षेत्रात विविध मोहिमा यशस्वी केल्या.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: पंडीत नेहरूंचे चित्र छापायचे नाही, हा निर्णय अयोग्यच!

त्यामुळे आपला देश हा विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला आहे. त्यात इंदिरा गांधी यांच्यासह इतरांचे योगदान राहिले. मात्र काही लोकांकडून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. तसेच देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भुजबळ फार्म कार्यालयात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शहरातील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला. नाशिकच्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले असल्याने त्यांच्या बलिदानाचा इतिहास विसरू नये, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, बाळासाहेब कर्डक, गजानन शेलार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार आदी उपस्थित होते.

.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com