जळगाव : जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे वृत्त मागील २ दिवसांपासून फिरत आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र आता या कथित अत्याचाराच्या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाचे या प्रकरणी जळगाव पोलिसांनी चौकशी करण्याच्या सुचना देणारे पत्र प्राप्त झाले असुन या पत्रान्वये चौकशी सुरू केली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याबाबत पोलिस अधिक्षक मुंडे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल दिवसभर जळगाव शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अजिंठा शासकीय विश्रामगृहावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातम्या फिरत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्य महिला आयोगाकडून चोकशी करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार रामानंद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.
मात्र या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे तसेच कोणतीही तक्रार पीडिता किंवा पीडितेच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेली नाही. मात्र राज्य महिला आयोगाच्या पत्राच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतर्फे या प्रकरणाची चौकशी करावी या बाबत निवेदन आम्हास प्राप्त झाले आहे. असेही जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
मात्र जळगावसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहरात या प्रकरणात दबक्या आवाजात एका मोठ्या राजकीय नेत्याच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंद झालेला नाही. पण या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.