Jalgaon Congress News: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची कारणे आता समोर येऊ लागली आहे. जळगाव शहरात हा पक्ष आता अस्तित्वासाठी झुंज देत आहे.
काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाशी आघाडी अपेक्षित होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळ्याच निर्णय घेतला.
जळगाव शहरात महापालिका निवडणुकीत महायुती समोर आघाडी सपशेल कोसळली. महाविकास आघाडीला अवघ्या सहा जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसचा पाय तर गाळात रुतलाच मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील फटका बसला आहे.
काँग्रेसने जळगाव महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी आघाडी करण्यास नकार दिला. यामागे कोणते नेते होते, याची आता चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचा हा निर्णय भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पथ्यावर पडला. भाजपला ४६ तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला २२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली.
काँग्रेसने या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांशी युती केली होती. त्यांचा हा निर्णय पक्षाला चांगलाच महागात पडला. काँग्रेसला मोजक्या प्रभागात मते मिळाली. मात्र एकही जागा जिंकता आली नाही.
लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि त्या पाठोपाठ महापालिकेतही काँग्रेसची संख्या नगण्य झाले. महाविकास आघाडीशी समझोता केला असता तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाही त्याचा लाभ होऊ शकला असता. मात्र काँग्रेसने घेतलेला निर्णय या पक्षाचे अस्तित्व संकटात नेणारा ठरला.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला फिरकला नाही. विशेषतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय सोपवला होता. त्याचा गंभीर परिणाम काँग्रेसच्या संख्याबळावर झाला.
निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले होते. पक्षाचा कोणताही राज्यस्तरावरील नेता प्रचाराला फिरकला नाही. उमेदवारांना कोणतीही मदत नव्हती. त्या तुलनेत शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप ह्या सर्व दृष्टीने सक्षम पक्षांनी उमेदवारांच्या विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात काँग्रेसचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.