Jalgaon DCC Bank : जळगाव जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष देवकर, उपाध्यक्ष सोनवणे यांचा राजीनामा

नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार, याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.
Gulabrao Devkar-Shyamkant Sonwane
Gulabrao Devkar-Shyamkant SonwaneSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon Dcc Bank) अध्यक्षपदाचा, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांच्या राजीनाम्यामुळे नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार, याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. (Jalgaon District Bank President Gulabrao Devkar, Vice President Shyamkant Sonwane resigned)

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडी-शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता आहे. निवडणुकीनंतर एका वर्षासाठी पद वाटपाचा निर्णय झाला होता. त्यानुसार देवकर आणि सोनवणे यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली होती. ठरलेल्या सूत्राप्रमाणे या दोघांचाही कालावधी पूर्ण झाल्याने दोघांचे राजीनामे घेण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला.

Gulabrao Devkar-Shyamkant Sonwane
Kasba By Election : राष्ट्रवादीकडून काटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब अन् कसबा 'बिनविरोध'च्या चर्चांना पूर्णविराम!

राष्ट्रवादी काँग्रेसकडे बॅंकेचे अध्यक्षपद होते, तर शिंदे गटाकडे उपाध्यक्षपद होते, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवकर हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे जाहीर केले होते, तर उपाध्यक्षपदाचा निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सोपविण्यात आला होता. गुलाबराव देवकर यांनी सोमवारी (ता. ६ जानेवारी) कार्यकर्यांत्यांशी चर्चा केली, त्यानंतर आपण राजीनामा देणार आहोत, असा निर्णय त्यांनी जाहीर केला.

Gulabrao Devkar-Shyamkant Sonwane
Maharashtra News : महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून आता 'हे ' नाव चर्चेत; मोदी, शाहांचे विश्वासू म्हणून ओळख

शिंदे गटाचे सोनवणे यांनीही जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आज सकाळी दहा वाजता अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. या वेळी माजी संचालक वाल्मिक पाटील होते.

Gulabrao Devkar-Shyamkant Sonwane
Balasaheb Thorat: मोठी बातमी! कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी संजय पवार, ॲड रवींद्रभय्या पाटील यांचे नाव चर्चेत आहेत. उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांचे पुढे येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे गट काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com