B.S. Patil Joins NCP : शिक्षकदिनी राजकीय गुरूकडून अनिल पाटलांना मोठा धक्का ; माजी आमदार बी. एस. पाटील राष्ट्रवादीत

NCP News : बी. एस. पाटील राष्ट्रवादीत दाखल झाल्याने विद्यमान आमदार, मंत्री अनिल पाटील यांच्यापुढे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे.
B.S. Patil Joins NCP
B.S. Patil Joins NCPSarkarnama
Published on
Updated on

Amalner : तीन वेळा आमदार राहिलेले अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बी. एस. पाटील राष्ट्रवादीत दाखल झाल्याने विद्यमान आमदार, मंत्री अनिल पाटील यांच्यापुढे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे.

अनिल पाटलांचे राजकीय गुरू म्हणून बी.एस.पाटलांची ओळख आहे. पण शिक्षकदिनी त्यांनी अनिल पाटलांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बी.एस.पाटील म्हणाले, "भाजपची नवीन विचारसरणी आवडत नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहे,"

B.S. Patil Joins NCP
Malegaon Sugar Factory : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग ; 'माळेगाव'चे अध्यक्ष तावरेंचा राजीनामा, अजितदादांच्या निर्णयाकडे लक्ष

खान्देशातील राजकारणात बी.एस.पाटलांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. अमळनेरमधून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.

१९९५ पासून बी.एस.पाटील भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, पण २००९ मध्ये पक्षश्रेष्ठींनी त्यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत डॉ.पाटील पुन्हा भाजपमध्ये गेले होते. डॉ. बी. एस. पाटलांनी अनिल पाटलांचा पराभव केला होता.

B.S. Patil Joins NCP
Laxman Dhomble News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून लक्ष्मण ढोबळेंवर मोठी जबाबदारी

अमळनेरची राजकीय समीकरणे बदलणार?

बी.एस. पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे अमळनेरची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. बी.एस.पाटील यांच्यासोबत चोपडा येथील युवा नेते डॉ.चंद्रकांत बारेला यांनीही शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही नेत्यांना मफलर घालून त्यांचे स्वागत केले.

गिरीश महाजन यांच्यासमोरच मारहाण..

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी. एस. पाटील यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आला होता. जाहीर कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर उदय वाघांच्या समर्थकांनी बी.एस. पाटलांना मारहाण केली होती. त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com