Shivsena News: जळगाव जिल्ह्यात महायुतीत दिवाळीत राजकीय फटाके फुटत आहेत. आमदार किशोर पाटील यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. यावरून रोजच आरोप- प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. आमदार किशोर पाटील यांनी त्याची घोषणा केली. याबाबत त्यांनी नगराध्यक्ष आणि एक उमेदवार देखील जाहीर केला.
जळगाव जिल्ह्यात भाजप आणि गिरीश महाजन यांचा राजकीय धबधबा आहे. त्याला महायुतीतूनच मोठे आव्हान मिळाले आहे. येईल त्याला आणि विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याला फोडण्याचे गिरीश महाजन यांची खेळी वादात सापडली आहे.
आमदार किशोर पाटील यांच्यावर मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय आमदार मंगेश चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले. जाहीर कार्यक्रमात मंगेश चव्हाण यांचे समर्थन महाजन यांनी केले. मात्र या समर्थनाने त्यांना अडचणीत आणले आहे. आमदार चव्हाण यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपसाठी चर्चेची दारे बंद केली आहे. पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा अगदी खिडकी देखील बंद केली. याचा अर्थ भाजपशी कोणतेही चर्चा करण्यास ते तयार नाहीत.
आमदार पाटील यांच्या भूमिकेमुळे भाजपदेखील स्वबळावर निवडणूक करणार आहे. याला सर्वस्वी आमदार किशोर पाटील जबाबदार आहेत. काही ठिकाणी असे होणार याची आम्हाला आधीच कल्पना होती, असे सूचक विधान मंत्री महाजन यांनी केले.
त्यानंतर आमदार किशोर पाटील हे देखील मागे राहिले नाहीत. त्यांनी भाजपच्या आणि मंत्री महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील धोरणावरच गंभीर प्रश्न निर्माण केला. यावरून आता ऐन दिवाळीत भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोपांच्या फटाक्यांची आतीषबाजी सुरू आहे.
आमदार पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा समाचार घेतला. भाजपला त्यांनी चांगलेच घेरले. हे करताना थेट भाजपचे सर्वेसर्वा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाच संदर्भ दिला.
महायुती होताना आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी शब्द दिला होता. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना परस्पर पक्षात प्रवेश द्यायचा नाही. विरोधात काम केलेल्या आणि निवडणूक लढविलेल्या नेत्यांचा कठोर विरोध करायचा असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी यातील सर्व गोष्टींना अवहेरले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष शिंदे यांनी माझ्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली. त्याला मंत्री महाजन यांनी सर्व प्रकारची मदत केली. आर्थिक सहाय्य देखील केले. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांना पक्षातून काढून टाकायला हवे होते. त्याऐवजी त्यांना मोठे पद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. माझ्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या इतरांना देखील मंत्री महाजन यांनी भाजपमध्ये आणले. हे कोणत्या धोरणात बसते?
केंद्रीय गृहमंत्री शाह यांचेच धोरण जळगाव जिल्ह्यात पायदळी तुडविले गेले, असा दावा या आरोप प्रत्यारोपात दिसतो. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना एकमेकांचे विरोधक म्हणून मतदारांपुढे जाणार हे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीत महाविकास आघाडी कुठेच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात विरोधकांची जागाही शिवसेना शिंदे पक्ष घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.