जळगाव : जळगाव नगरपालिका स्थापनेच्या १३२ आणि महापालिका स्थापनेच्या १८वर्षानंतर जळगावचे (Jalgaon) प्रथम नागरिक महापौरांना सरकारी निवासस्थान मिळणार आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
जळगाव नगरपालिकेला १३२ वर्षाचा इतिहास आहे, स्वातंत्र पूर्व काळात १८६२ मध्ये जळगावात येथे नगरपालिकेची स्थापना झाली. तर २००३ मध्ये पालिकेचे जळगाव महापालिकेत रूपांतर करण्यात आले. महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्या महापौरपदाचा मान आशा कोल्हे यांना मिळाला. आजपर्यंत झालेल्या कोणत्याही महापौरांनी सरकारी निवासस्थानाची मागणी केली नाही, किंवा सताधरी गटातर्फे प्रस्तावही देण्यात आला नव्हता.
महापालिका स्थापनेनंतर प्रथमच महापौरांना सरकारी निवासस्थान द्यावे, असा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना गटनेते नितीन लढ्ढा यांनी मांडला, आज ऑनलाईन बैठकीत त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या पीठासन अध्यक्ष महापौर जयश्री महाजन (Jayashree Mahajan) होत्या. विरोधी भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाला मंजुरी दिली, पक्षाच्या नगरसेविका अँड. शुचिता हाडा म्हणाल्या की, सर्वच महापालिकेत महापौर यांना सरकारी निवासस्थान आहे, त्यामुळे जळगाव येथेही महापौर यांना सरकारी निवासस्थान देण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे. आज शिवसेनेचा महापौर असला तरी येत्या काळात आमचा भाजपचा महापौर होणार आहे. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
जळगाव महापालिकेच्या मालकीचे सहा निवासस्थाने आहेत. त्यात एक जुने आहे, त्याचा वापर होत नाही. इतर पाच निवासस्थानात आयुक्त व उपायुक्त दर्जाचे अधिकारी राहतात. त्यामुळे आता महापौरांना कोणते निवासस्थान देण्यात येणार याकडे जनतेचे लक्ष आहे. शासकीय निवासस्थान घेणाऱ्या आता जयश्री महाजन या पहिल्या महापौर असतील.
जळगाव मनपाच्या मालकीचे काही निवासस्थान सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यापैकी शाहूनगरजवळ एक, मू.जे.महाविद्यालयाजवळ, जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूला दोन निवासस्थान आहेत. महापौरांना यापैकी एखादे निवासस्थान महापौरांना मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.