Gulabrao Patil: मी राजीनामा द्यायच्या तयारीत: गुलाबराव पाटील संतापले...

Jalgaon Milk Sangh news Gulabrao Patil: सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत,तर मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या सत्ताधारी संचालक मंडळासह जिल्हाध्यक्ष संघाच्या प्रशासनाला इशारा दिला.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

शेतकऱ्यांनी आणलेले दूध घेतले जात नाही, अनुदान दिलं जात नसेल, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यामुळे दूध संघाच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना झापले.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेची बैठकीत पाटलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर मलाही संचालक राहायचे नाही...मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे, असे ते म्हणाले.

तीन मंत्री संचालक असलेल्या दूध संघाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांमुळे संताप करीत मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दूध संघाचे भाजप अध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाला घरचा आहेर दिला. गुलाबरावांनी दूध संघांच्या अध्यक्षांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.

जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेत त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. "जिल्हा दूध संघ हा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसेल त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर नक्कीच राजीनामा देण्याबाबत मला विचार करावा लागेल," असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भाजप आमदार मंगेश चव्हाण बैठकीला उपस्थित नव्हते.

Gulabrao Patil
Sainath Babar: मोठी बातमी: मनसेचा पहिला उमेदवार ठरला! पुण्यात साईनाथ बाबर Vs वसंत मोरे?

"शेतकऱ्यांचे दूध घेतलं जात नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असेल सत्ता असून काय करायचं," या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यशाळेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. येत्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत,तर मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या सत्ताधारी संचालक मंडळासह जिल्हाध्यक्ष संघाच्या प्रशासनाला इशारा दिला.

गुलाबराव पाटील म्हणाले,"मी मोठ्या अपेक्षेने सहकारात आलो. दुध संघ वाचावा अशी माझी इच्छा आहे. मात्र सध्या कारभारात अनेक गफलती आहेत. दूध संघ वाचवायचा असेल, मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला नाव ठेवतो, मात्र गोकुळ बरोबर आपण काय करू शकतो या गोष्टी मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com