Chandrakant Patil: एक रुपयाचेही काम केलं नाही; महायुतीतील आमदारानेच खडसेंना दाखवला आरसा

Raver Lok Sabha Constituency 2024: 'आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते,'अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना आरसा दाखवत खडसावले आहे.
Raver Lok Sabha Constituency 2024
Raver Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात असलेली नाराजी अजून संपलेली दिसत नाही. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता महायुतीतील आमदारानेच त्यांच्याविरोधात रणशिंग फुकले आहे.

मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही जाहीरपणे रक्षा खडसे यांच्याविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 'आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते,' अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंनी आरसा दाखवत खडसावले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत असताना केळी पीक विम्याच्या प्रश्नावरून खासदार रक्षा खडसे यांनी माझ्याविरोधात भूमिका मांडली. त्यांनी मतदारसंघात एक रुपयाचेही काम केले नाही, असा गंभीर आरोप पाटलांनी केला. एकनाथ खडसे यांच्यासोबत माझे तीस वर्षांपासून वैचारिक वाद आहेत, असेही पाटील यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आडकाठी आणली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. रक्षा खडसेंनी या आरोपांचे समर्थन केले होते.

Raver Lok Sabha Constituency 2024
Akola Lok Sabha 2024: 'मविआ'चं ठरलं; अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

रक्षा खडसे यांच्यावर मी कधीही व्यक्तिगत टीका केली नाही, तरीही त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले, अशी नाराजी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. "त्या ज्या प्रकारे वागल्या असतील त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिले जाईल. जशी त्यांच्या खात्यात शस्त्र आहेत तशीच आमच्या खात्यातदेखील शस्त्रं असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी खासदार खडसे यांना आव्हान दिले आहे.

"चंद्रकांत पाटील हे महायुतीचे सदस्य असल्याने महायुतीच्या नेत्यांनी त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निवडणूक केवळ रक्षा खडसे यांची नसून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यावेळी पंतप्रधान करण्यासाठीची आहे. त्यामुळे युतीमधील वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळणे गरजेचे आहे," असे खडसे म्हणाल्या.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com