जळगाव महापालिकेत गदारोळ ; उपमहापैार-नगरसेवकांमध्ये बाचाबाची

उपमहापौर कुलभूषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करीत तोडपाणी केल्याचा आरोप करण्यात आला यावरून सभेत वाद निर्माण झाला.
Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation

sarkarnama

Published on
Updated on

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महासभेच गदारोळ झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. उपमहापैार कुलभूषण पाटील (Kulbhushan Patil) आणि नगरसेवक कैलास सोनवणे (Kailas Sonavane) यांच्यात वादंग निर्माण झाले. त्यांनी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

महासभेत उपमहापौर व्यासपीठावर बसल्याचा आक्षेप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी घेतला यावरून जळगाव महापालिका( Jalgaon Municipal Corporation) महासभेत गदारोळ झाला. सकाळी अकरा वाजता महासभेस प्रारंभ झाला, महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होते, उपमहापौर कुलभूषण पाटील,आयुक्त राजेश कुलकर्णी व्यासपीठावर होते.

भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर व्यासपीठावर बसू शकतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून उपमहापौर कुलभूषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करीत तोडपाणी केल्याचा आरोप करण्यात आला यावरून सभेत वाद निर्माण झाला.

<div class="paragraphs"><p>Jalgaon Municipal Corporation</p></div>
रुपाली ठोंबरे-पाटलांचं ठरलं..घड्याळ बांधणार..

शिवसेनेने भाजपला दिला वर्क ऑर्डरचा राजकीय डोस!

पाचोरा : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा पाया मानला जातो. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आपला प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणताही विषय असो, त्याला राजकीय स्पर्श झाल्याशिवाय राहात नाही. या माध्यमातून राजकीय कुरघोड्या वाढत असल्याने तालुक्यावरील राजकीय ढगांचा गडगडाट वाढला आहे.

लोहारा (ता. पाचोरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकाम प्रकरण शिवसेनेने मंत्रालयापर्यंत नेऊन मंत्रिमहोदयांकडून बांधकामाची वर्कऑर्डर मिळवून भाजपला चांगलाच डोस दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले आहे. लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामास गेल्या वर्षीच परवानगी मिळाली. निधीही मंजूर झाला. परंतु बांधकामाची वर्कऑर्डर देण्यास मात्र जिल्हा परिषदेकडून विलंब झाला. सरपंच अक्षय जैस्वाल यांनी अनेकदा वर्कऑर्डरसंदर्भात मागणी केली. हे प्रकरण खंडपीठापर्यंतही गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com