Jalgaon Politics: उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 13 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray’s Shiv Sena 13 former corporators join BJP: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन माजी महापौरांसह 13 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Uddhav Thackeray  .jpg
Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती आहे.  जळगाव महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन माजी महापौरांसह 13 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाकरेचे निकटवर्तीय माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

या 13 नगरसेवकांच्या प्रवेशाने जळगावात भाजपची ताकद वाढणार आहे, ज्याचा फायदा आगामी महापालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकीत होऊ शकतो. एका माजी नगरसेवकाने ही माहिती दिली आहे. नितीन लड्डा यांच्या उपस्थितीत बैठकीत प्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित होणार असल्याचे समजते.

नितीन लढ्ढा यांच्या फॉर्म हाऊसवर झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या 13 नगरसेवकांच्या भाजपप्रवेश तारीख ठरणार आहे. त्यामुळे आता सुरेश जैन यांच्या निर्णयाकडे या 13 नगरसेवकांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray  .jpg
Jansuraksha Bill: वादातील ‘जनसुरक्षा’; मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येणार? काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी

जळगाव शहर महापालिकेवर दीड वर्षांपासून प्रशासकराज आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक ऑगस्ट २०१८ मध्ये झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जळगाव महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आला.

गेल्या निवडणुकीत काय झाले होते?

२००७, २०१२, २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वबळावर लढले होते. महापालिकेच्या निवडणुकीतही सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते, आताही हीच परिस्थिती असल्याने महायुती-आघाडी शिवाय स्वबळावर लढा, अशी येथील कार्यक्रर्ते व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com