MD Drugs Crime: धक्कादायक, एमडी ड्रग्स तस्करांशी पोलिसांचेच संबंध, जळगावच्या उपनिरीक्षकासह दुसरा पोलिस बडतर्फ!

Jalgaon Police Crime; PSI Dattatrey Pote terminate from police service in drugs connection -तरुण पिढीला उध्वस्त करणाऱ्या ड्रग्स तस्करांशी पोलिसांचेच धक्कादायक संबंध
Drugs & PSI Dattatray Pote
Drugs & PSI Dattatray PoteSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News: समाज आणि तरुण पिढीला उध्वस्त करण्यात ड्रग्स माफीयांचा मोठा हातभातस्करी ड्रग्स तस्करी रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारीच तस्करांच्या संपर्कात असल्याचे धक्कादायक प्रकरणे उघड होऊ लागली आहेत.

जळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना ड्रग्स तस्करांशी संपर्क असल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी नाशिकमध्ये गाजलेल्या एमडी ड्रग तस्कर प्रकरणातील बहुचर्चित बडी भाभी आणि तिच्या सहकाऱ्यांचे पोलिसांचा संपर्क असल्याचे स्पष्ट झाले होते.

जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील पडक्या शाळेजवळ पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी सर्फराज जावेद मिस्त्री यांच्या घरात ५२.२० ग्रॅम एमडी ड्रग्स आढळले होते. त्याचा मुख्य सूत्रधार अब्रार मुख्तार कुरेशी असल्याचे स्पष्ट झाले होते. कुरेशी हा गेले काही महिन्यांपासून फरार होता. या कालावधीत उपनिरीक्षक पोटे त्याच्या संपर्कात असल्याचे आढळले.

Drugs & PSI Dattatray Pote
Raj Thackrey Politics: सत्ताधारी मंत्री, आमदारांना जमले नाही, त्याचा भार आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर, काय आहे प्रकरण?

एमडी ड्रग्स हे अत्यंत घातक असून त्यात गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत आहे. युवा पिढीला या ड्रग्सने विळखा घातला आहे. त्याबाबत विविध यंत्रणा त्याला प्रतिबंध करण्यासाठी आटापिटा करताना दिसतात. मात्र पोलिसातील अधिकारीच या गुन्हेगारांना मदत करीत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संदर्भात विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर झालेल्या चर्चेत गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी जळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पोटे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय जाहीर केला. अशाप्रकारे सेवेतून बडतर्फ होणारे अलीकडच्या काळातील हे दुसरे पोलीस अधिकारी आहेत.

नाशिक शहरातील बहुचर्चित एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर थेट मुंबईच्या अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेने छापा टाकला होता. त्याचा नाशिकच्या पोलिसांना मागमुसही नव्हता. एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचे थेट सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पोलीस उपनिरीक्षक पोटे याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. एमडी ड्रग्स सारख्या घातक मादक पदार्थांच्या तस्करीतील आरोपींची असा संपर्क ठेवणे धक्कादायक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निलंबनानंतर पोटे याची तीन महिने उपविभागीय चौकशी झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com