जळगांव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांविरुद्ध महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असलेल्या षडयंत्राचा पुरावा म्हणून १२५ तासांचे रेकाॅर्डिंग असलेले पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले.(Jalgaon) त्यानंतर दुसरा पेन ड्राईव्ह धमाका करत भाजपने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले. यावर पुर्वी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीत (Ncp) गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सूचक विधान केले आहे.
पेन ड्राईव्ह प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे दुध का दूध आणि पाणी का पाणी करतीलच, यातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि माझ्याकडे असलेली सीडी देखील, असा इशारा खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला. माझ्याकडे निश्चितच सीडी आहे, ती मी कधी बाहेर काढेन हे सांगितले नव्हते, पण ती लवकरच बाहेर येईल याचा पुनरुच्चार देखील खडसे यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली. खडसे म्हणाले, पेन ड्राईव्ह प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, गृहमंत्री याचा पर्दाफाश करतील. विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने ते अनेकांचे संबंध दाऊदशी जोडत आहेत, त्यामुळे प्रसिद्धी मिळते म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे.
माझ्यावर देखील दाऊदच्या बायकोशी बोलणे होत असल्याचा आरोप झाला होता, त्याचे पुढे काय झाले? हे सगळ्यांनाच माहित आहे. राजकाणार आपल्या वाटेत येणाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी खोटेनाटे आरोप केले जातात. फोन टॅपिंग प्रकरणात माझेही फोन टॅप करण्यात आले होते. संजय राऊत आणि माझे फोन टॅप झाले होते. या संदर्भात आपण गृहसचिवांना कळवले होते.
जे जे स्पर्धक वाटतात त्यांचे फोन टॅप केले गेले, माझी भिती वाटत असल्यामुळेच कदाचित माझेही फोन टॅप झाले. या संदर्भात आज कुलाबा पोलिस ठाण्यात चौकशी झाल्याचेही खडसे म्हणाले. सध्या चर्चेत असलेला प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनचा माणूस असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला.
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा अधिकार असतांना ती टाळली जात आहे, आता तर न्यायालयाने देखील या नियुक्त्याबद्दल आदेश दिले आहेत, तेव्हा राज्यपाल बारा आमदारांच्या नियुक्त्या करतील अशी आशा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीत काय प्रश्न विचारले हे त्यांनाच विचारा, असे म्हणत खडसे यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.