Local Body Election: सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी पक्षांनी फुंकले रणशिंग, तिसरी आघाडी स्थापन करणार

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे.
Local body elections Maharashtra
Local body elections MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

✅ 3-Point Summary

  1. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.

  2. जामखेड तालुक्यात समविचारी पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

  3. नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला.

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे.

महाविकास आघाडी की महायुतीमध्ये लढायचे याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये अद्यापही अनेक ठिकाणी संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच जामखेड तालुक्यात समविचारी पक्ष एकत्र आले आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येत आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूका लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सत्ताधारी पक्षाने जामखेड तालुक्यात अनेक समस्या सोडवल्या नाहीत, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी समविचारी पक्षांनी कंबर कसली आहे. तिसरी आघाडी स्थापन करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Local body elections Maharashtra
US Tariffs 2025: लेदर ते ज्वेलरी! डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्या वस्तूंवर वाढवला कर

पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील समविचारी राजकीय संघटना, पक्षांची एकत्र बैठक झाली. यात हा निर्णय झाला. रस्ते, पाणी पुरवठा, शेतकरी कर्जमाफी, आरोग्य, शिक्षण, महिला आदी प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करुन आगामी निवडणूक लढणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

लहान पक्षातील फुटीमुळे आणि राजकीय स्पर्धेमुळे सत्ताधाऱ्यांना संधी मिळते, पण आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे सूर बैठकीत नेत्यांचा होता.

वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण जाधव, काँग्रेसचे शहाजी राजेभोसले, मनसेचे प्रदीप टाफरे, रासपाचे विकास मासाळ, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सुनील लोंढे, युवक काँग्रेसचे राहुल उगले आदी यावेळी उपस्थित होते.

Q1: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आहेत?
A: निवडणुका दिवाळीनंतर घेतल्या जाणार आहेत.

Q2: जामखेड तालुक्यात कोणत्या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला?
A: काँग्रेस, मनसे, वंचित, रासप, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आदी समविचारी पक्ष एकत्र आले.

Q3: तिसरी आघाडी का स्थापन करण्यात आली?
A: सत्ताधाऱ्यांच्या अपयशाला उत्तर देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी.

Q4: निवडणुकीत कोणते प्रमुख मुद्दे असतील?
A: रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शेतकरी कर्जमाफी, शिक्षण, महिला हक्क हे प्रमुख मुद्दे असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com