Balasaheb Thorat Vs Rohit Pawar : राहुल गांधी ताकदीने लढतात, पण गल्लीत काय? काँग्रेसचा भाजपच्या हातात हात; पवारांनी फोटोच आणले समोर...

Jamkhed Municipal Election: Rohit Pawar Shares Photos of Congress Leaders With BJP, Replies to Balasaheb Thorat : काँग्रेसचे पदाधिकारी भाजपबरोबर असल्याचा आरोपावरून रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यामध्ये जुंपली आहे.
Balasaheb Thorat Vs Rohit Pawar
Balasaheb Thorat Vs Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

BJP Congress controversy : जामखेड नगरपालिकेतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला चांगलेच टार्गेट केले आहे. नगरपालिका निवडणुकीत, काँग्रेस ही भाजपची बी-टीम म्हणून काम केले.

रोहित पवारांच्या या गंभीर आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. तसंत रोहित पवारांनी कार्यकर्त्यांचा आग्रह कसा मोडला, यावर थोरातांनी थेट भाष्य केले. आता यावर रोहित पवार यांनी काँग्रेस ही भाजपची बी-टीम असल्याचा पुनरूच्चार करत, थेट फोटो समोर आणले आहेत.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर तब्बत आठ फोटो शेअर करत आहेत. या फोटोमध्ये विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याबरोबर काही कार्यकर्त्यांचे फोटो आहेत. हे फोटो शेअर करत, रोहित पवारांनी केलेल्या पोस्टमध्ये गोड शब्दात काँग्रेसला जिव्हारी लागलेल असं सुनावलं आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "थोरातसाहेब आपला इंटरव्ह्यू बघितला. आपल्याविषयी काहीही तक्रार नाही, कायमच आदरच आहे. पण ज्यांनी माझ्याविरोधात प्रा. राम शिंदे यांचा प्रचार केला, त्यांनाच काँग्रेसने (Congress) पदं दिली. त्यांचे हे फोटो आपण आवर्जून बघा. यांचे आपल्यासोबत कमी पण भाजप नेत्यांसोबतच अधिक फोटो आहेत. शिवाय काँग्रेसने ज्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तो आहे भाजप आमदाराचा कार्यकर्ता. ज्याने आष्टी विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराविरोधात काम केलं."

Balasaheb Thorat Vs Rohit Pawar
Sangamner taluka railway issue : नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत, मंत्री विखेंनी दिला शब्द! पण संगमनेरचा उल्लेख टाळला?

असं असेल, तर हे लोक भाजपची बी-टीम नाही का? आणि आपणच सांगा अशा घरभेद्या ‘बी-टीम’ सोबत मी चर्चा कशी करणार? आश्चर्य याचं वाटतं. दिल्लीत राहुलजी गांधी हे भाजपविरोधात ताकदीने दोन हात करतात आणि इकडं गल्लीत मात्र काँग्रेसच भाजपच्या हातात हात घालतोय. हे कितपत योग्य आहे? असा सवाल रोहित पवार यांनी करत, ही पोस्ट हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस टॅग केली आहे.

Balasaheb Thorat Vs Rohit Pawar
Walmik Karad accused : वाल्मिक कराड कोर्टात पहिल्यांदा बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, तरी तो बोलतच राहिला...

पवारांची सुरूवातीची पोस्ट...

रोहित पवार यांनी सुरूवातीला केलेल्या पोस्टमध्ये काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपची बी-टीम म्हणून काम केलं. जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला होता.

थोरात नेमकं काय म्हणाले...

रोहित पवार यांच्या या पोस्टवर बाळासाहेब थोरात यांनी, "जामखेड संदर्भात पवारांना सांगितलं होते की, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा. मात्र विधानसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. आता निवडणुकीला समोरे जाताना आपले मुद्दे बाजूला ठेवून तडजोड करावी लागले. पण त्यांनी ते केलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com