Video : भाजपने कॉलरला धरून अर्ज मागे घ्यायला लावले? गिरीश महाजनांचा पाठिंबा असल्याचा आरोप; भाजपचे 'संकटमोचक' संकटात

Video : जामनेर नगरपरिषद निवडणुकीत साधना महाजन व भाजपचे 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. मात्र हे बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकून माघार घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
Jamner municipal election, Sadhana Mahajan and 9 BJP candidates won unopposed amid allegations of pressure and misuse of tactics.
Jamner municipal election, Sadhana Mahajan and 9 BJP candidates won unopposed amid allegations of pressure and misuse of tactics.Sarkarnama
Published on
Updated on

Jamner Nagarpalika : जामनेर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. याशिवाय शुक्रवारी (21 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही भाजपचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पण बिनविरोध करताा भाजपने साम दाम दंड भेद नीतीचा दुरुपयोग केला, दबाव टाकून माघार घेतल्याचा गंभीर आरोप झाला.

नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी शेवटची तारीख होती. यात जामनेर नगरपरिषदेतही 9 जागांवरील उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. पण हे अर्ज मागे घेताना भाजपकडून प्रचंड दडपशाही झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गौरव दिलीप खोडपे यांनी केला. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारनामाने गौरव खोडपे यांच्याशी संपर्क साधला.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही कार्यकर्ते एका उमेदवाराल कॉलरला पकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर नेतात आणि अर्ज मागे घ्यायला लावतात. हे कार्यकर्ते भाजपचे असल्याचा दावा खोडपे यांनी सरकारनामासोबत बोलताना केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून सर्व तंत्राचा वापर करून अर्ज मागे घ्यायला लावले. दबावातूनच उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडले.

Jamner municipal election, Sadhana Mahajan and 9 BJP candidates won unopposed amid allegations of pressure and misuse of tactics.
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांची तिरकी चाल; नगरपालिका निवडणुकीतून दिला महापालिकेसाठी शिंदे सेनेला मेसेज!

अर्ज मागे घेतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांमध्ये बाचाबाची आणि झटापट ही झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत भाजपचा निषेध केला. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या गोंधळाचे व्हिडिओ घेतले. यातील काही व्हिडिओ कार्यकर्त्यांनी व्हायरल केले.

या सगळ्या गोष्टींना मंत्री गिरीश महाजन यांचा आशीर्वाद असल्याचा दावा गौरव खोडपे यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी शक्यच होणार नाहीत, असे खोडपे यांनी म्हंटलं आहे. भाजपचे मंत्री आणि नेते विकास केल्याचा दावा करतात. यावरून महाजन यांना निवडणूक जिंकायचीच होती तर त्यांनी लोकांमध्ये जाऊन मत मागून निवडणूक जिंकायला हवी होती, असेही ते म्हणाले.

Jamner municipal election, Sadhana Mahajan and 9 BJP candidates won unopposed amid allegations of pressure and misuse of tactics.
Girish Mahajan Politics: ‘द्राक्ष निर्यातदारांची पंढरी’ भाजपला जिंकायचीच! मंत्री गिरीश महाजन यांच्या घोषणेनं विरोधकांची ‘बत्ती गुल’!

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत भाजपकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. किंवा भाजपकडून अद्याप कोणीही बाजू मांडलेली नाही. ही बाजू किंवा खुलासा समोर येताच त्याची स्वतंत्र बातमी करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com