Jayant Patil: जानकरांविषयी विशेष जिव्हाळा, पण... असे जयंत पाटील का म्हणाले..

Mahadev Jankar: जानकर यांनी शरद पवार यांच्याकडे मागितल्या तीन जागा
Jayant Patil, Mahadev Jankar
Jayant Patil, Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Nagar: राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत अजून तरी पक्ष हा सामील झालेला नसला, तरी तशी धडपड सुरू आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी या निवडणुकीत आपल्या पक्षाला लोकसभेत एन्ट्री मिळवून देण्याचा चंग बांधला आहे. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे युतीसाठी चाचपणी सुरू केली. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. "महादेव जानकर यांच्याविषयी विशेष जिव्हाळा आहे. पण राष्ट्रवादी म्हणून त्यांची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही", असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

रासपचा नगरमध्ये पक्ष मेळावा झाला. या मेळाव्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभेत यावेळी कोणत्याही परिस्थिती एन्ट्री मिळणार, असा चंग बांधला आहे. हा पक्ष बहुजनांच्या मालकीचा आहे. विधानसभा पासून ते ग्रामपंचायत पर्यंत पक्षाचा विस्तार आहे. परंतु लोकसभेत पक्षाने अजून यश मिळवलेले नाही. हे यश यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाकडून विविध पातळीवर चाचपणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे राज्यासह राज्याच्या आजूबाजूला असलेल्या इतर राज्यात चाचपणी करीत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil, Mahadev Jankar
Rohit Pawar: राज ठाकरे महायुतीत आले तर...रोहित पवार म्हणाले...

काही ठिकाणी लोकसभेचे उमेदवार निश्चित केले आहे. या उमेदवारांना बळ देण्यासाठी इतर पक्षांकडे देखील चाचपणी सुरू आहे. काही स्थानिक संघटना, मंडळ आणि इतर बहुजनांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही मोक्याच्या जागांवर सर्व्हे देखील करण्यात आले आहे. या जागा लढवल्यास भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते.

राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीची असा लोकसभेत सामना रंगणार आहे. या दोन्हीकडे रासपने युतीसाठी चाचपणी केली आहे. भाजपने दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे तीन जागांची मागणी केली. युतीच्या जागावर रासप परिणामकारक निकाल देऊ शकते, असा दावा करत महादेव जानकर यांनी या जागांवर दावा केला आहे. महादेव जानकर यांच्या या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, "आमची अडचण आहे. ते मागत आहेत, त्यातील एकच जागा आमच्याकडे असून, ती आम्हीच लढवणार आहोत. आम्ही एक जागा देऊ शकतो कदाचित. दुसरी जागा जी मागत आहे, ती आमच्या मित्र पक्षांचे खासदार आहेत. त्यामुळे काही अडचणी आहेत. महादेव जानकर यांच्याविषयी विशेष जिव्हाळा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही. आम्ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com